आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच ध्यास, टाळू पर्यावरणाचा -हास, पर्यावरण जागृतीवर होणार विविध कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ग्लोबलवॉर्मिंगची समस्या जगाला भेडसावत असून, भविष्यात गंभीर प्रश्न उद‌्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करत व्यापक जागृती होण्याची गरज आहे. देशात सुरू झालेल्या भारत स्वच्छ अभियान हे पर्यावरण संरक्षणाचाच एक भाग असून, या अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखत आरोग्यही जपले पाहिजे, असे मत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले.
गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एसएमआरके महिला महाविद्यालयात सोमवार, दि. रोजी आयोजित वाणिज्य सप्ताहाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद‌्घाटन झाले. या वेळी आमदार फरांदे बोलत होत्या. याप्रसंगी सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, विभागीय सचिव प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, पर्यावरणप्रेमी किरण रहाळकर, समन्वयक प्रा. सुवर्णा कदम आदी उपस्थित होते. वाणिज्य सप्ताहाची यंदाची संकल्पना पर्यावरणविषयक जागरूकता- जागृती ही पहिली पायरी आहे या विषयावर आधारलेली असून, आठवडाभर क्षेत्रभेट, व्याख्यानांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाच्या उद‌्घाटनप्रसंगी आमदार फरांदे यांनी सांगितले की, महास्वच्छता अभियानातून आरोग्याबरोबरच पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. युवकांनी या अभियानात सहभागी होऊन जागृती करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. प्राचार्या दीप्ती देशपांडे यांनी वाणिज्य सप्ताहाचे वेगळेपण सांगत विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. किरण रहाळकर यांनीही पर्यावरण विषयावर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला.