नाशिक- पाणी,ऊर्जा, घनकचरा, जैव विविधता आणि संस्कृती संवर्धन यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची गरज अाहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचा प्रसार प्रबोधन करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणीय समस्या समजून घेत आदर्श गाव साकारण्याचा संकल्प करत शिक्षकांनी निसर्ग संवर्धनाचे धडे गिरवले.
िनमित्त हाेते, शासनाच्या पर्यावरण विभागाकडून पर्यावरण सेवा याेजनेच्या नाशिक जिल्ह्यातील पळसे येथे शिक्षकांसाठी अायाेजित तीनदिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे. या कार्यशाळेत शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे धडे गिरवले. या कार्यशाळेत विविध भागातील १५ माध्यमिक शाळांचे शिक्षक, तसेच मुख्याध्यापकांनी हजेरी लावली हाेती. पर्यावरण सेवा याेजनेत पाणी, ऊर्जा, घनकचरा, जैवविविधता संवर्धन संस्कृती या विषयाचा अभ्यास शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर केला जाणार अाहे. त्या अनुषंगाने ही कार्यशाळा अायाेजित करण्यात अाली हाेती. त्यात शाळा, शिक्षक, समुदाय शासन एकत्र अाल्यास गावातील पर्यावरणीय प्रश्न समजून गावाचा चेहरा-माेहरा बदलून अादर्श गाव बनू शकते. कार्यशाळेत अन्न जाळे, निसर्ग संपत्ती मानव परस्पर सहसंबंध, गुंतागुंतीची प्रक्रिया यांसारख्या खेळांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव अाधारित पर्यावरण शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात अाले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी गावाचे पर्यावरण सर्वेक्षण कशाप्रकारे करावे लाेकांमध्ये जाऊन पर्यावरणीय प्रश्न कशा प्रकारे समजून घ्यावेत, याबाबत दिवसभर मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांसाेबत चर्चा करण्यात अाली. त्यात शिवार फेरी, गावाचा सामाजिक, संसाधन नकाशा, जंगल, जैवविविधता, शेती, सिंचन, स्वच्छता, कुटुंब सर्वेक्षण अशा विविध प्रश्नांचा समावेश करण्यात अाला हाेता.
यांनी केले मार्गदर्शन
कार्यशाळेतपर्यावरण विभागातील अविनाश मधाळे, कल्याण टांगसाळे, सुप्रिया निशाणदार, जगदीश ठाकूर, भीमाशंकर ढाले, गणेश सातव, दिनेश वाघमारे, जाेएब दाऊदी, धनंजय सायरे अादींनी मार्गदर्शन केले.
लोकसहभागातून शक्य अाहे सर्वांगीण विकास
पर्यावरणसेवा याेजनेच्या माध्यमातून गावाची पर्यावरण सद्यस्थिती अहवाल ग्रामीण सहभागीय मूल्यावलाेकन तयार करण्याचे ज्ञान काैशल्य शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत देण्याचा प्रयत्न केला अाहे. प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थी लाेकसहभागातून गावाचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करून ग्रामसभेत सादर करतील त्यातून पर्यावरणस्नेही विकास साध्य हाेऊ शकताे. -जगदीश ठाकूर, प्रकल्पाधिकारी, नाशिक विभाग
प्रौढनागरिक मित्रमंडळातर्फे डिसुझा कॉलनी येथे घेण्यात अालेल्या कै. सुमन बर्डे संस्कृत पाठांतर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात अनुक्रमे नेहा पोद्दार, जान्हवी पाटील, अस्मिता सांगळे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पहिल्या गटात श्लोक कुलकर्णी (द्वितीय), आदिती घोडेकर (तृतीय) पुष्कर चंदात्रे (उत्तेजनार्थ) या विद्यार्थ्यांनी यश िमळवले. दुसऱ्या गटात आकांक्षा तांबट (द्वितीय), तर तिसऱ्या गटात वैष्णवी कवडे (द्वितीय), वैदेही पाटील (तृतीय) अभिजित जाधव, पार्थ आहेर (उत्तेजनार्थ) या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. सर्व विद्यार्थ्यांना नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांच्या हस्ते पारितोषिकंाचे वितरण करण्यात अाले. शहरातील २० विद्यालयांतील एकूण ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सचिन जामदार यांनी सूत्रसंचालन केले. तर, आशा चौधरी, सुवर्णा पाटील यांनी अाभार मानले.