आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environmental Expert Atul Deulagavakara,latest News In Divya Marathi

नेते, उद्योजकांकडून पर्यावरणाचा -हास, कर्मवीर जयंती व्याख्यानात देऊळगावकर यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जगभरात उत्पादन वाढीसाठी विविध कारखान्यांकडून निरंतर कार्बन उर्त्सजन होत असते. त्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने पृथ्वीचे तपमान वाढले असून, अमेरिका, रशिया, चीन आणि भारत हे देश त्यासाठी जास्त कारणीभूत आहेत; मात्र त्यांच्यासोबतच भारतासारख्या देशात मात्र नैसर्गिक संपत्तीचा -हास होण्यामागे राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजक हे प्रामुख्याने जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी गुरुवारी केला.
कर्मवीर काकासाहेब वाघ जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. ९) शंकराचार्य संकुलात ‘बदलते पर्यावरण विश्वाचे आर्त’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
हवामान बदलामुळे माळीण, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि केदारनाथसारख्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस पर्यावरणाच्या ऱ्हासाचे प्रमाण वाढले असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. राजकीय पुढारी, अिधकारी आणि उद्योजकांच्या चुकीच्या धोरणांमुळे हवामान बदलाचे संकट आले असल्याचे प्रतिपादन देऊळगावकर यांनी केले.
ते म्हणाले की, पर्यावरणाबाबत राजकीय पक्षांत उदासीनता दिसून येते. कोणत्याही पक्षाने निवडणुकीमधून पर्यावरण विकासासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. पर्यावरण वाचविले तर मुबलक पाणी, हवा प्राप्त होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सध्या शेतीसाठी सत्तर टक्के पाणी लागत असल्याने कमी पाण्यावरील शेती करण्याला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले, नाफेडचे संचालक चांगदेवराव होळकर यावेळी उपस्थित होते.