आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखे अभियान: स्वच्छ गोदावरीसाठी ‘मिस्ड कॉल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(०२२-६२११६८५५ क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देत समर्थन देण्यासाठी पर्यावरणप्रेमींचे आवाहन)
नाशिक- प्रदूषण विरहित गोदावरीसाठी निर्मल गोदा अभियानांतर्गतही प्रशासन कमी पडत असल्याने पर्यावरण प्रेमींनी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाला पाठिंबा देत निर्मल गोदावरीसाठी समर्थकांनी ०२२६२११६८५५ या टोल फ्री क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ करण्याची विनंती पर्यावरणप्रेमींतर्फे करण्यात आली आहे.

गोदावरीचे गटारीकरण थांबाविण्यासाठी निर्मल गोदा अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत मानव उत्थान मंच, आपलं पर्यावरण ‘आवास’सह काही पर्यावरणप्रेमी संस्थांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच त्यात १० हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या थेट पंतप्रधानांना पाठविण्यात आल्या आहेत.
त्याच धर्तीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी १५ जूनपर्यंत गोदावरी प्रदूषणविरहित करण्याचे अाश्वासन दिले आहे. या वेळेत मिसळणारे गटारींचे पाणी बंद झाल्यास या ‘मिस्ड् कॉल’ची सर्व माहिती थेट पंतप्रधानांनाच सादर केली जाईल, असेही या पर्यावरणप्रेमींतर्फे स्पष्ट करण्यात आले.
रिक्षाचालकांचाही उपक्रमात सहभाग
गोदावरीचेगटारीकरण थांबण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमांकाचे फलक रिक्षांसह विविध ठिकाणी लावण्यात आले. विशेष म्हणजे रिक्षाचालकांनी त्यास समर्थन देत रिक्षावर हे पोस्टर्स लावण्याचीही परवानगी देऊन अभियानात सहभाग नोंदविला आहे.
बातम्या आणखी आहेत...