आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Environmental Protection Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॅलीद्वारे पर्यावरण रक्षण, मतदार जागृतीचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मतदान करणारच करणारच, सेव्ह वॉटर सेव्ह लाइफ, पर्यावरण वाचवा, भविष्य वाचवा, वृक्ष लावा, जीवन जगवा... अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाबरोबरच मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

निमित्त होते, पर्यावरण रक्षण व मतदार जागृती विषयावर आयोजित रॅलीचे. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे विविध कार्यक्रम झाले. पर्यावरण वाचवा व मतदार जागृती रॅलीद्वारे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ व ह्यरासेयोह्ण विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके, प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर, प्रा. डी. आर. कुटे, व्ही. जी. वाघ, विद्यार्थी कल्याण अधिकारी वाल्मीक इंदासे, ह्यरासेयोह्णप्रमुख एस. शेख आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सायकलद्वारे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क प्रत्येकान बजावलाच पाहिजे, असा संदेशही या वेळी देण्यात आला.
अंधश्रद्धा धोकादायक
महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष महेद्र दातरंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भोंदूबाबा चमत्काराच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा प्रसार करत आहे. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक डोळसपणे लक्षात घेऊन भोंदूबाबांच्या आमिषांना बळी पडू नये.