आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोमेट्रिक हजेरीद्वारे इपीएफ पेन्शन जमा, भविष्य निर्वाह निधी आयुक्त तांबे यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- निवृत्तीनंतर कामगारांना पेन्शनचा मोठा आधार असतो. मात्र, पेन्शन मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी बायोमेट्रिकचा पर्याय अवलंबला जाणार आहे. हयातीच्या दाखल्याएेवजी बायोमेट्रिक हजेरीद्वारे पेन्शन जमा करण्यात येणार असल्याने पेन्शनधारकांच्या अडचणी कमी होणार अाहेत, असे भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा इ.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने सोमवारी (दि. ११) प. सा. नाट्यगृहात संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना तांबे म्हणाले, ‘लाभार्थ्यांना पेन्शन वेळेवर प्राप्त झाली पाहिजे, यासाठी बँकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून बँॅकेविरोधातील तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लाभार्थ्यांनी आधार कार्ड क्रमांक बँकेच्या खात्यासोबत जोडावेत.’

बायोमेट्रिक हजेरीवर पेन्शन मिळण्यासाठी तालुकास्तरावर एक केंद्र उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, कामगारवर्ग, पेन्शनधारकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असून, ‘अच्छे दिन’ची अद्याप प्रतीक्षाच असल्याचे पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले. कामगारांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष सरकारच्या कामगारविरोधी धोरणाबाबत २५ एप्रिलला नवी दिल्ली येथे मोर्चाचे अायाेजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी संागितले.

निवृत्त साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष पोखरकर यंानी पेन्शनधारकांनी पेन्शन पेमेंट ऑर्डर याची सर्व माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. पेन्शनमधून किती कपात होते, याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी कॅप्टन अशोक राऊत, देवराव पाटील, चेतन पणेर, सुभाष काकड, बापू रांगणेकर, विष्णुपंत गायके आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते.

मेळाव्यातील प्रमुख ठराव
-२००८ ते २०१५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहा हजार ५०० रु. पेन्शन महागाई भत्ता
- सेवानिवृत्तांना विनामूल्य दर्जेदार वैद्यकीय सेवा
नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशन मेळाव्यास उपस्थित सेवानिवृत्तधारकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.