आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेतील भरमसाट कामांना आता ब्रेक, तरतूद असेल तरच कामे होणार मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिक तरतूद नसताना भरमसाट कामांना मंजुरी देऊन दायित्वाचा डोंगर वाढविण्याच्या प्रकारांना आता ब्रेक लागणार असून, चालू वर्षापासून महापालिकेने बजेटसाठी इआरपी अर्थात एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग प्रणालीद्वारे कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रणालीतून एकाच कामावर वारंवार खर्च करण्यासारख्या गैरप्रकारांनाही चाप बसेल, असा दावा वित्त अधिकारी राजेश लांडे संगणक विभागाचे प्रमुख पी. बी. मगर यांनी केला.

२००५मध्येच शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना इआरपी सिस्टिमद्वारे काम करण्याचे बंधन घालून दिले होते. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेला राज्यपातळीवर समन्वयक म्हणूनही जबाबदारी दिली. प्रत्यक्षात या प्रणालीची अंमलबजावणी झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आर्थिक शिस्त धोक्यात आली.

यंदा मात्र आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर इआरपीची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याचाच एक भाग म्हणून क्रिसील झेन्सार या कंपन्यांनी नॅशनल अकाउंट मॅन्युअल २००६चा वापर करून इआरपी कार्यान्वित केली आहे. यात महापालिकेचे ऑनलाइन बजेट बघता येईल. त्यातून प्रत्येक विभागाची तरतूद, त्या अनुषंगाने झालेला कामानिहाय खर्चही बघता येईल.

औषधे संपली तरी वाजेल कार्यालयात अलार्म

या सॉफ्टवेअरमध्ये किरकोळ गोष्टीपासून तर महत्त्वाच्या साहित्याच्या साठ्यावर नियंत्रण ठेवता येईल. खासकरून मोटार विभागातील सुटे पार्ट‌्स औषध खरेदीसारख्या विषयात कोणती औषधे शिल्लक कोणती संपण्याच्या मार्गावर याची क्लिकसरशी माहिती मिळेल. यात औषधे संपुष्टात आली तर अलार्मही वाजण्याइतपत सुविधा असतील, असेही सांगण्यात आले.

इआरपीचा घेतला अधिकाऱ्यांनी धसका

पुरेशी संगणकीय व्यवस्था नाही, कर्मचारी प्रशिक्षित नाही ज्यांना वर्षभरापूर्वी प्रशिक्षण दिले त्यांनाही त्या आता पडलेला विसर या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून महापालिकेत लागू झालेली इआरपी सिस्टिम अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र आहे. पुरेशी कल्पना देता प्रणालीद्वारे बिले पाठविण्याची सक्ती झाल्यानंतर आता कर्मचारी हैराण झाले आहेत.
मुळात या प्रणालीसाठी आवश्यक संगणक व्यवस्थाच महापालिकेकडे नाही. आजघडीला ६५० संगणक पालिकेत असून, त्यातील काही संगणक सॉफ्टवेअर जुने असल्यामुळे त्यांचा वेगही कमी असल्याची समस्या आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इआरपीद्वारे फायली दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तांत्रिक कर्मचारीच नसल्यामुळे महापालिकेतील अनेक विभागांची कामे ठप्प झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विचारले असता मगर यांनी येत्या काही दिवसांत सिस्टिम पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली की गतिमान कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.