आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकल बिलांमध्ये २२ लाखांचा अपहार, चार डॉक्टरांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुटूंब योजनेंतर्गत शासनसेवेतील लाभार्थ्यांच्या डायलिसिसच्या बिलांमध्ये अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अाहे. याप्रकरणी एका डॉक्टरच्या तक्रारीनुसार चार डॉक्टरांच्या विरोधात अपहार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम्प्लाॅइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पाेरेशन आणि महाराष्ट्र पोलिस कुटंब योजनेंतर्गत शासनाकडून मिळालेल्या सुमारे २२ लाखांच्या बिलांमध्ये चार डॉक्टरांनी अपहार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
याप्रकरणी डॉ. देवतत्त चाफेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार डिंसेबर २०१४ ते ऑक्टोंबर २०१५ या कालावधीत टिळकवाडीतील सोहम हॉस्पिटल येथे सुप्रीम किडनी केअर डायलिसिस संेंटर सोहम हॉस्पिटल यांच्यात करार झाला. या कराराप्रमाणे इएसअायसीच्या लाभार्थी रुग्णांचे १४ लाख ६३ हजार आणि महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजनेतील पोलिस कुटुंबियांचे लाख ६१ हजारांचे शासनाकडून मिळालेले बिल १० टक्के टीडीएस कापून सोहम हॉस्पिटलला देणे भाग होते. मात्र संशयित डॉ. अजय परदेशी, डॉ. विजय थोरात, डॉ. भरत पाटील, डॉ. प्रशांत जोशी यांनी ही रक्कम देता अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उपनिरिक्षक अदिनाथ मोरे तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...