आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकवर्गणीतून फलोत्पादन संशोधन, कृषी विपणन संस्था स्थापावी: शरद पवार यांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाडी येथे सह्याद्री फार्मर्स कंपनीत माहिती घेताना शरद पवार. - Divya Marathi
मोहाडी येथे सह्याद्री फार्मर्स कंपनीत माहिती घेताना शरद पवार.
नाशिकरोड / दिंडोरी- शेतकऱ्यांना पूर्वीपासूनच संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षामधून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी एकमेकांना मदत करून शेतकरी कंपनीची स्थापना करावी. राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटप्रमाणे फळबाग आणि भाजीपाला उत्पादकांना एका छत्राखाली आणणाऱ्या सक्षम संस्थेची गरज आहे. त्यासाठी शासनाची मदत घेता शेतकऱ्यांनाच लोकवर्गणी काढून फलोत्पादन संशोधन कृषी विपणन संस्था सुरू करावी लागणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून नव्या वाणांचे संशोधन तसेच विपणनव्यवस्थेत प्रभावी बदल करून विकास साधता येईल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी मोहाडी येथे व्यक्त केले. 

शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नाशिक जिल्ह्यात कृषी माल आणि प्रक्रियेबाबत स्थापन केलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. वाघाड पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून वाघाड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वाघाड धरणातील पाण्याचे स्वयंस्फूर्तीने व्यवस्थापन करून आणि आधुनिक शेतीची कास धरल्याने हा परिसर आता सुजलाम‌् सुफलाम‌् बनला आहे. तर सह्याद्री फार्मर्सच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांनी कुठल्याही दलाल आणि व्यापाऱ्यांशिवाय स्वत:च शेतीमालाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग सुरू केले असून देशातील इतर शेतकऱ्यांसाठी शेतीचे हे स्वयंपूर्ण मॉडेल आदर्शवत ठरत आहेत. याची पाहणी पवार यांनी करत येथील शेतकऱ्यांच्या संघटित प्रयत्नांचे कौतुक केले. सह्याद्री फार्मर्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी स्वागत करत उपक्रमाची माहिती दिली. पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अगदी तंत्रशुद्ध माहिती देत मार्गदर्शन केले. 

विशेष म्हणजे यावेळी सरकारवर कोणतीही टीकाटिपण्णी करता शेतकऱ्यांनी संघटित येत करायची वाटचाल यावर भाष्य करताना ते म्हणाले, देशातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी सर्वात प्रथम मी शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या कंपन्या सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे देशात विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कंपन्या सुस्थितीत सुरू आहेत. शेतकरी कंपन्यांनीदेखील ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे त्यांना शेतीमाल देण्याची गरज आहे. यासाठी राज्यात आता एका सक्षम व्यासपीठाची गरज असून त्यादृष्टीने आता पाऊल टाकण्याची गरज आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना करणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. प्रारंभी कादवाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह शेतकरी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. वनाधिपती विनायकदादा पाटील, सह्याद्री कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, आमदार जयंत जाधव, रवींद्र पगार, जगन्नाथ खापरे उपस्थित होते. 

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा 
राज्यातआत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणे हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी इतर शेतकऱ्यांनी पीडित शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. 

पडत्या काळात बँकांनी मदत करावी 
शेतकऱ्यांचीपरिस्थिती चांगली असली तर बँका त्यांच्यामागे धावतात. मात्र, शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली तर बँका शेतकऱ्यांना उभेदेखील करत नाही हे दुर्दैवी चित्र बदलण्याची गरज आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना पडत्या काळात मदत करावी, असे पवार यांनी सांगितले. 

सह्याद्री ठरणार देशातील शेतकऱ्यांसमोर आदर्श 
नाशिकजिल्ह्यातील सह्याद्री फार्मर्स कंपनी ही देशातील इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरत आहे. यासाठी मी स्वत: केंद्रातील कृषी विभागाशी संलग्न अधिकाऱ्यांना येथे अभ्यासासाठी पाठविणार आहे. विलास शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन करावे, असे पवार यांनी सांगितले. 

शेतीमध्येही हाेताेय कोर्टाचा हस्तक्षेप 
परदेशातूननवीन वाणाची देशात आयात करायची असेल तर त्या ठिकाणीही कोर्टाचा हस्तक्षेप असतो. कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला काहीच बोलता येत नाही, असे पवार यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...