आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी वैज्ञानिकांना मिळेल मंगलयानाची माहिती, प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची अावड निर्माण व्हावी त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकाेन विकसित व्हावा, यासाठी संडे सायन्स स्कूल, कल्पना यूथ फाउंडेशन आणि विज्ञान प्रबाेधिनीच्या वतीने प्रजासत्ताकदिनी ‘माझे मंगलयान’ या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. भावी वैज्ञानिकांसाठी अायाेजित हा शैक्षणिक उपक्रम िपनॅकल माॅल येथे दुपारी १२ ते या वेळेत हाेणार अाहे.
या उपक्रमात सहभागी हाेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मंगलयान संच दिला जाणार अाहे आणि याच संचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:चे ‘मंगलयान’ माॅडेल बनवण्यास मदत होणार आहे. या माॅडेलच्या िनर्मितीतून िवद्यार्थ्यांना अंतराळ माेहिमेची माहिती िमळेल. तसेच, कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मंगलयान मंगलयान माेहिमेच्या वैशिष्ट्यांबद्दलदेखील सविस्तर माहिती देण्यात येणार अाहे. यात अवकाशाच्या संबंधित प्रत्येक गोष्टींविषयीचे ज्ञान दिले जाईल. भारताच्या मंगळावर गेलेल्या पहिल्या यानाबद्दल या कार्यशाळेद्वारे सेलिब्रेशन केले जाणार आहे.कार्यशाळेचे उद‌्घाटन स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळेविषयी अधिक माहितीसाठी ९८२३११४७७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अावाहन विद्यार्थी पालकांना करण्यात अाले अाहे.

देशाचा विकास हाच अामचा दृष्टिकाेन
स्पेसएज्युकेशनबद्दल विद्यार्थांमध्ये रुची वाढावी आणि देशाचा विकास व्हावा, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह मॉडेल्स बनविण्यासाठी मार्गदर्शन, रॉकेट लाँचिंग, स्पेस शटल, हबल टेलिस्कोप, सोलर पॅनल्स तसेच वैज्ञानिक अॅप्लिकेशनचाही समावेश करण्यात येणार आहे. अपूर्वाजाखडी, नासा स्पेस एज्युकेटर