आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठात एकांकिका स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे विद्यापीठ परिसरात आणि सप्टेंबर रोजी या एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांची विद्यार्थी आवर्जून वाट पहात असतात. या एकांकिका स्पर्धांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषांतील एकांकिका सादर करता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत: लिहिलेल्या तसेच दिग्दर्शित केलेल्या एकांकिकांना प्राधान्य असणार आहे. सदर स्पर्धेमध्ये पुणे, नाशिक अहमदनगर विभागांतील विद्यापीठ संलग्न मान्यताप्राप्त महाविद्यालये सहभागी होऊ शकतात. एकांकिका प्रवेश अर्जांसमवेत विद्यार्थ्यांनी नेपथ्याची यादी, कलाकारांची यादी, एकांकिकेच्या प्रती जोडायच्या आहेत. हे प्रवेश अर्ज २० ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत द्यायचे आहेत. २१ ऑगस्ट रोजी लकी ड्रॉ पद्धतीने एकांकिकांची दिनांक आणि वेळ ठरवून जाहीर केली जाणार आहे. या एकांकिकांचा कालावधी कमीतकमी २५ मिनिटे जास्तीत जास्त ३० मिनिटे असावा, असेदेखील सांगण्यात आले आहे.

या एकांकिकांपैकी ज्या एकांकिका विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर लेखकांच्या असतील, त्यांची लेखी परवानगी असणेदेखील आवश्यक आहे. स्पर्धेची मुख्य अट सांगते की, विद्यार्थी लेखकांच्या एकांकिकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. याप्रमाणे एकांकिकांची तयारी करायची आहे. पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात सकाळी ते रात्री या वेळात ही स्पर्धा घेतली जाईल. याविषयीची अधिक माहिती आणि प्रवेश अर्जांसाठी पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२५ हजारांची बक्षिसे अन‌् चषक
पुणेविद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस हजार रुपये, द्वितीय बक्षीस हजार रुपये तर तृतीय बक्षीस हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, विशेष लक्षवेधी अभिनय, विनोदी अभिनय, नेपथ्यकार, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, विद्यार्थी लेखक आणि सर्वोत्कृष्ट रंगमंच व्यवस्था अशी तब्बल २५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.