आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एव्हरेस्ट’ची जबाबदारी झटकतात अधिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एव्हरेस्ट कंपनीच्या उर्वरित 25 कामगारांना रुजू करून घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही कामगार उपायुक्त आणि जिल्हाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित हात झटकट आहे. त्यामुळे या कामगारांना 23 महिन्यांपासून अद्याप कामावर रुजू करून घेतले नाही, असा आरोप करत कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.

16 जानेवारी रोजी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे समन्वय समितीची बैठक झाली होती. त्यात कामगारांना कामावर घेण्यासंदर्भात निर्णय झाला होता; मात्र कंपनीने सर्वच कामगारांना कामावर न घेता टप्प्या-टप्प्याने भरती केली. त्यात प्रथम 75 त्यानंतर 25 कामगारांना रुजू करून घेतले. शिल्लक असलेल्या 26 कामगारांबाबत गेल्या आठ महिन्यांपासून एव्हरेस्ट व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, व्यवस्थापन त्यास दाद देत नाही. याची जिल्हाधिकारी विलास पाटील आणि कामगार उपायुक्त आर.एस. जाधव यांनाही याची माहिती दिली आहे. दोघेही हा आमचा विषय नसल्याचे सांगत तो सोडविण्याऐवजी वेळ मारून नेत असल्याचा आरोपही या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला. कुठलाही तोडगा निघत नसल्यामुळे अखेर कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावर तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा कामगारांच्या वतीने देण्यात आला. या वेळी सीटूचे उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, नंदू मंडलिक, अँड. भूषण सातळे, योगेश देशमुख, सुऱेश रंधे आदी सहभागी झाले होते.