आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वसंरक्षणासाठी प्रत्येक मुलीने व्हावे निर्भय पुणे विद्यापीठातर्फे केटीएचएम महाविद्यालयात उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक : वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षेचे वाटू लागले आहे. शालेय विद्यार्थिनींपासून ते महिलांनाही लक्ष्य केले जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी निर्भय करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे निर्भय कन्या अभियान राबविले जात असून, या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहे.
 
निर्भयता येण्यासाठी मुलींनी व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. सुरक्षेच्या साधनांची माहिती घेऊन बिकट परिस्थितीत त्याचा वापर केला पाहिजे, असे आवाहन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी येथे केले. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान कार्यशाळेच्या  उद्घाटनप्रसंगी व्हीएलसी सभागृहात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. पल्लवी धर्माधिकारी, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डी. एच. शिंदे, प्रा. सुनंदा पाटील, प्रा. डी. व्ही. ढोकळे, डॉ. संजय सावळे, प्रा. उमेश शिंदे, प्रा. बी. जे. भंडारे उपस्थित होते. 
 
प्रथम सत्रात ‘आरोग्यातून निर्भयतेकडे’ या विषयावर डॉ. पल्लवी धर्माधिकारी म्हणाल्या की, स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण कमी होत आहे. समाजात त्याबाबत प्रबोधन होत असल्याची बाब सकारात्मक असल्याचे सांगितले. स्रियांचे प्रमाण महाराष्ट्रात आणि देशातही पुरुषांच्या तुलनेत वाढत आहे. 
 
100 विद्यार्थिनींनी घेतला सहभाग 
निर्भयकन्या अभियान कार्यशाळेत केटीएचएम महाविद्यालयातील एकूण १०० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत स्वसंरक्षणाचे धडे गिरवले. या उपक्रमानंतर आत्मविश्वास दुणावला असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी बोलून दाखविल्या. 
 
यावेळी डॉ. रोहिणी पाटोळे यांनी ‘महिला सक्षमीकरणाची गरज विशद केली. सचिन पवार दोन अन्य महिला प्रशिक्षकांच्या सहकार्याने ज्युदो कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच, प्रशिक्षणही देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डी. एच. शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुनंदा पाटील यांनी करून दिला.सूत्रसंचालन माधुरी वाघ यांनी केले. प्रणिता देशमुख हिने आभार मानले. 
बातम्या आणखी आहेत...