आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी महापौरांचा मनसेला झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाआघाडीमुळे प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुका सरळ पार पडतील, अशी अपेक्षा असताना गुरुवारी चक्क मनसेचे पहिले महापौर अॅड. यतनि वाघ यांच्यासह प्रमुख नगरसेवकांनी पक्षादेश डावलून काँग्रेसएेवजी मनसेच्याच नगरसेविकेला मतदान केल्यामुळे पक्षाला जबरदस्त झटका बसला. दरम्यान, मनसेत फूट पाडण्याची शिवसेना भाजपची खेळी यशस्वी झाल्याचे दिसून आले.
स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत आकाराला आलेल्या मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस अपक्षांच्या महाआघाडीचे नाशिकरोड वगळता पाचही प्रभागात सभापती होतील, असे नियोजनही झाले. सिडको, सातपूर नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकाही त्यामुळे सरळ झाल्या. गुरुवारी नाशिक पश्चिम, पूर्व पंचवटी या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकात शिवसेना भाजपने मनसेतील अंतर्गत वादाचा पुरेपूर फायदा उचलत नवीन खेळी खेळली. या सर्वात मनसेतील माजी महापौरांसह महत्त्वाचे नगरसेवकही अडकल्यामुळे मोठा राजकीय भूकंपच झाला.
चार मनसे नगरसेवक भाजपच्या वाटेवर
लाेकसभा,विधानसभा निवडणुकीतील पराभव, पक्षाचा आेसरलेला करिष्मा यामुळे मनसेचे चार नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त असून, प्रभाग समिती निवडणुकीत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी पक्षादेश झुगारल्यानंतर आता नाराजांचा येत्या महनिाअखेरपर्यंत भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, तसे झाल्यास महापालिकेतील मनसेचे नगरसेवकांचे संख्याबळ ४० वरून ३२ पर्यंत येईल अशी स्थिती आहे.
सानपांना मनसेचा दणका
एकीकडेभाजपचे तीन आमदार मनसेतील बंडाळीचा फायदा घेऊन धक्का देण्यात यशस्वी झाले असताना पंचवटी प्रभाग सभापतिसाठी हाच धक्का राष्ट्रवादीला देण्यात मात्र भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यशस्वी होऊ शकले नाहीत. महाआघाडीतील तडजोडीनुसार ही जागा राष्ट्रवादीच्या सुनीता शिंदे यांना दिली होती. येथे भाजपच्या संपर्कातील मात्र मूळ अपक्ष दामोधर मानकर यांनी बंडखोरीचा प्रयत्न सुरू केला होता. तिकडे मनसेतील नाराज नगरसेवक गणेश चव्हाण रुची कुंभारकर यांनाही फूस लावण्याचा भाजपचा प्रयत्न झाला. मनसेत दुसरी मोठी फूट होण्याची चनि्हे दिसू लागल्यावर मात्र महानगरप्रमुख अॅड. राहुल ढिकले यांनी डॅमेज कंट्रोल सुरू केले. त्यांनी मनसे नगरसेवकांना पाचारण करून राजीनामे घेतले. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, विरोधी पक्षनेता कविता कर्डक हे तिघे येथील मतदार असल्यामुळे त्यांनी आपले नगरसेवक नियंत्रित करून भाजपला धक्का दिला. काँग्रेसचे नगरसेवकही पश्चिमचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असल्याच्या चर्चेने वातावरण तापले होते.
भाजपातही कुरघोडीचे राजकारण
भाजपातआलेले माजी आमदार वसंत गिते यांनी आपले समर्थक नगरसेवकांच्या माध्यमातून मनसेला धक्का देण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शिवसेनाही त्यास अनुकूल असल्याचे बघून वेगाने घडामोडी घडल्या. सभापतिपदासाठी भाजपचा अर्ज नसताना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना भाजपचे तनि्ही आमदार अर्थातच देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर सीमा हिरे हे तिघे मतदानासाठी हजर झाले त्यांनी मनसेचा उमेदवार हायजॅक करून विजयी केल्यामुळे तर धक्का बसला. मात्र, पक्षासाठी मोठे काम करण्याचे श्रेय नवीन पदाधिकाऱ्यांना घेता येणार नाही याचीही पुरेपूर दक्षता घेतल्याचे लपून राहिले नाही.
काँग्रेसमधील छाजेड गटाला धक्का
काँग्रेसपक्षात माजी आमदार जयप्रकाश छाजेड अन्य असे दोन गटांच्या कुरघोडीमधील राजकारण अनेक वेळा बघायला मिळाले. प्रभाग समिती निवडणुकीतही छाजेड गटाच्या सम‌र्थक मानल्या जाणाऱ्या आहेर यांना शह देण्याचे प्रयत्न लपून राहिले नाही. काँग्रेसच्या वदि्यमान पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत फारशी सावधानता बाळगल्यामुळे मनसेतील फाटाफुटीचा फटका काँग्रेसला बसला.

व्हीप डावलला
सिडको,सातपूरमधील मदतीची परतफेड म्हणून पश्चिम प्रभाग समिती सभापतिपद काँग्रेसला सोडण्यात आले. येथे काँग्रेसच्या नगरसेविका योगिता आहेर यांची सभापती हेण्याची शक्यता होती. येथे मनसेच्या नगरसेविका माधुरी जाधव यांचाही अर्ज होता. निवडणूक प्रक्रियेत जाधव अर्ज माघारी घेतील त्यानंतर काँग्रेसच्या आहेर यांना मतदानाचा व्हीपही बजावला होता. प्रत्यक्षात व्हीप डावलून मनसेच्या जाधव यांनाच मतदान झाले. यात शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, वनिायक पांडे यांनी भाजपच्या तीन सदस्यांसह जाधव यांना मतदान केल्याने त्यांची सभापतिपदी निवड झाली.

पश्चिम प्रभागसमिती सभापतिपदाच्या बदललेल्या राजकीय गणिताने काँग्रेसच्या योगिता आहेर यांना अश्रू अनावर झाले.