आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Examinees Inconvenient In Collects Certificate For TET

टीईटीसाठी प्रमाणपत्र जमा करताना परीक्षार्थींची गैरसाेय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात टीइटी परीक्षार्थींची प्रमाणपत्रे जमा करण्यासाठी अशी गर्दी झाली होती.
नाशिक - तिसरी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २७ डिसेंबर रोजी होत असून, त्यासाठी १४ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होती. तेव्हापासून ते नोव्हेंबरपर्यंत अर्जदारांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरून ऑनलाइन अर्ज ट्रॅझॅक्शन आयडीसह अपडेट करता येणार होता. त्यानंतर आवेदनपत्र, चलनपत्र, जात प्रमाणपत्र आणि अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत ही गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जमा करायची होती. शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने अर्जदारांची नाशिक तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती. मात्र, या ठिकाणी टेबल अपुरे असल्याने अर्जदारांची गैरसोय झाली होती.

प्रमाणपत्र, चलनपत्र आणि आवेदनपत्र देण्याची अंतिम मुदत ही नोव्हेंबर असल्याने अर्जदारांनी अर्ज जमा करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, नाशिक शहर आणि तालुक्यातील अर्जदारांची संख्या तीन हजार होती. इतर तालुक्यातील अर्जदारांनी नाशिक तालुक्यातील केंद्रावर अर्ज देण्यास पसंती दिल्याने या ठिकाणी तुलनेने मोठी गर्दी झाली. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली होती. मंगळवारी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कमाल तपमान हे ३१.५ असल्याने उकाडाही मोठ्या प्रमाणात जाणवत होता. महिला अर्जदारांनी आपल्या सोबत लहान बालकांना सोबत आणल्याने त्यांची अतिशय गैरसोय झाली होती.

असे आहे वेळापत्रक...
>चलनबँकेत शुल्कासह आयडी अपडेट : १४ऑक्टोबर ते नोव्हेंबर.
>प्रमाणपत्राच्या प्रतीदेणे : १४ऑक्टोबर ते नोव्हेंबर
>ऑनलाइन प्रिंटकाढणे : दि.१४ डिसेंबर ते २७ डिसेंबर
>शिक्षक पात्रतापरीक्षा पेपर - : दि. २७ डिसेंबर
>शिक्षक पात्रतापरीक्षा पेपर - : दि. २७ डिसेंबर

भर उन्हात रांगेत उभे राहावे लागले
बँकेमध्ये चलन भरण्यास गर्दी होती आणि दुसऱ्या दिवशीही चार तास रांगेत उभे राहावे लागले. कर्मचारी अधिक असते तर कमी वेळ लागला असता. सवितागिरी, अर्जदार
१५ ऑक्टोबरपासून अर्ज जमा करण्याची गरज होती. मात्र, विद्यार्थ्यांनी अंतिम टप्प्यात खूप गर्दी केली. तसेच इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नाशिक केंद्रावर अर्ज दिल्याने गर्दी झाली. अनिल शहारे, गटशिक्षणाधिकारी

महिलांजवळ मुले असल्याने त्यांनाही उन्हात उभे राहावे लागले. त्यामुळे महिला अर्जदारांची जास्त गैरसोय झाली. अशा वेळी महिलांना प्राधान्य देण्याची गरज होती. - विद्या गायकवाड, अर्जदार

नाशिक केंद्रावर अर्ज जमा करण्यासाठी महिलांना कर्मचाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने प्रशासनाने किमान पाणी पिण्याची तरी सोय करायला हवी होती. योगेश गांगुर्डे , शहराध्यक्ष