आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 18 डिसेंबरला रंगणार ‘पेट टुगेदर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक कॅनाइन क्लब, कॅट फॅन्सिअर्स असाेसिएशन अाणि पेट प्रॅक्टिशनर्स असाेसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाशकात १८ डिसेंबरला ‘पेट टुगेदर’ या पाळीव प्राण्यांच्या संमेलनाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. व्हिरिडियन व्हॅलीत सकाळी ते सायंकाळी या वेळेत हे प्रदर्शन पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निखिल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनात ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नाेंदवला असल्याने तेवढ्याच प्रकारचे पाळीव प्राणी ‘पेट टुगेदर’मध्ये पाहायला मिळणार अाहेत. त्यात सर्व बालकांना माेफत प्रवेश असून, पालकांना नाममात्र प्रवेश शुल्क अाकारून प्रवेश देण्यात येणार अाहे. प्रदर्शनात सुमारे २०० श्वानांच्या भिन्न जाती पाहायला मिळणार अाहेत. त्यात काॅकेशिअन शेफर्ड, न्यू फाऊंडलंड, ग्रे हाऊंड, तिबेटियन मॅस्टिक, रफ काॅली, सेंट्रल अाशियन शेफर्ड अशा भिन्न प्रकारच्या श्वानांचा समावेश अाहे. रंगीबेरंगी अाकर्षक १५० प्राणी पाहायला मिळणार अाहेत. तर पक्ष्यांमध्ये मकाऊ, काकाकुवा, अाफ्रिकन ग्रे पॅरेट, सन कनूर, फिजन्ट, काेकाटिल, राेझेला, ट्यूरॅकाे, इमू या पक्ष्यांंना पाहण्याची संधी मिळणार अाहे. यापूर्वीच्या तीन ‘पेट टुगेदर’मधील अाकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या अमेरिकन इग्वाना, शुगर ग्लायडर, गिनी पिगदेखील बालगाेपाळांना पाहायला मिळणार अाहेत. यावेळी त्यांच्यासमवेत साकीब पठाण, डाॅ. भास्कर ठाकूर, अजिंक्य चाेपडे अादी पदाधिकारी उपस्थित हाेते.

प्रथमच रंगणार ‘कॅटवाॅक’ शाे
या प्रदर्शनात १५० हून अधिक मांजरींची नाेंदणी झाली अाहे. त्यात पंच फेस कॅट्स, हिमालयन कॅट‌्स, सयामी कॅट‌्स, स्काॅटिश फाेल्ड कॅटसह अनेक प्रकारच्या मांजरांच्या जातींचा अंतर्भाव अाहे. तसेच, प्रथमच त्यांच्या कॅटवाॅक स्पर्धेचेही अायाेजन करण्यात अाले अाहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अाॅस्ट्रेलिया अाणि मलेशियातून जज बाेलावण्यात अाले असल्याचेही पंडित यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...