आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिबेटियन मार्केटमध्ये प्रचंड स्फोट, 12 गाळ्यांची शटर-छपरे उडाली; सुदैवाने जीवितहानी टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केटमधील गाळ्यांमध्ये शनिवारी (दि. ७) पहाटे प्रचंड स्फोट झाला. प्रथमदर्शनी हा स्फाेट गॅसगळतीमुळे झाल्याचे दिसत असले तरी पाेलिस अन्य शक्यताही तपासून पहात अाहेत. स्फोटानंतर एका तासाने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आल्यानेही त्यामागील गूढ वाढले आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे १२ गाळेधारकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 
 
महापालिकेच्या मालकीचे हे मार्केट असून या परिसरात विविध कपडे व्यावसायिकांसह खाद्यपदार्थांची विक्री करणारे स्टाॅलही आहेत. हे स्टॉलधारक त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे विविध भांडे, गॅस सिलिंडर, भाजीपाला ठेवण्यासाठी या गाळ्यांचा उपयोग करतात. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ६) रात्री लकी चायनीजचे संचालक चांगदेव पालवे यांच्या गाळ्यातील शेगडीला जोडलेल्या सिलिंडरच्या नळीतून गॅसगळती झाली शटर बंद असल्याने गॅस बाहेर पडण्यास मार्ग राहिला नाही. जमा झालेल्या गॅसचा अतिदबाव निर्माण झाल्याने नंतर स्पार्किंगमुळे पहाटे वाजेच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे काही दुकानांची शटर उडाली, तर काही गाळ्यांच्या भिंती छप्परही पडले. या गाळ्यांपासून २०० मीटरपेक्षा लांब असलेल्या एका इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. दिवसभर गजबजलेल्या असणाऱ्या या परिसरात सुदैवाने पहाटेच्या वेळी वर्दळ नसल्याने जीवितहानी टळली. 
 
स्फाेटाची माहिती मिळताच तातडीने सरकारवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी, बॉम्ब शोध नाशक पथक (बीडीडीएस),दहशतवादविरोधी पथक (एटीएस), रासायनिक विश्लेषक पथक (फॉरेन्सिक) तातडीने मार्केटकडे धावले. त्यांनी केलेल्या तपासणीत प्रथमदर्शनी स्फाेट गॅसगळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तरीही या गाळ्यांत अवैधरित्या गॅस भरला जात होता का, किंवा कोणी घातपाताच्या उद्देशाने स्फोट घडवून आणला का? याही दिशेने पोलिस तपास करत आहेत. 
 
या प्रकरणी गाळामालक पालवे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक एस. सी. सोनाेने करत आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे आदींनी घटनास्थळी सर्व माहिती घेतली. 
 
गाळा मालकांकडून वसूल करणार नुकसानभरपाई : यास्फोटाने नागरिकांसह महापालिका प्रशासनही हादरले आहे. स्फोटामुळे सुमारे १२ गाळ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गाळयाचे छप्पर, भिंती पडल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या आदेशानुसार स्फोट झालेल्या गाळ्यांच्या मालकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार असून याबाबतची नोटीसही बजाविण्यात आली. तसेच, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी गाळेधारकांनी अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना करून फायर सेफ्टी साहित्य बसविले अाहे का, याबाबतही तपासणी केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांनी दिली. 
 
दुकाने सुरू ठेवण्यावरून वाद, टवाळखोरांचा हैदाेस : स्फोटानंतरतिबेटियन मार्केटमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवले होते. मात्र, मार्केटलगत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या खालील परिसरात असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू ठेवले हाेते. सायंकाळी वाजेच्या सुमारास काही टवाळखाेरांनी या ठिकाणी तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
 
स्फोटके आढळली.. अाता झाला स्फोट 
चारचदिवसांपूर्वी गौळाणे, पाथर्डीरोडवर तब्बल दहा इमारती उडविण्याची क्षमता असलेले जिलेटीन, डिटोनेटर सापडले होते. या स्फोटकांबाबत तपास सुरू असतानाच तिबेटियन मार्केटमध्ये मोठा स्फोट झाल्याने पोलिस यंत्रणा चक्रावली आहे. दोन्ही घटनांचे गूढ कायम असून पोलिसांकडे तपासासाठी ठोस माहितीही नसल्याने अनेक चर्चा झडत आहेत. 
 
परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण 
पहाटेच्यासुमारास अचानक झालेल्या या स्फोटामुळे प्रचंड आवाज झाला. आवाजामुळे परिसरातील एका रहिवासी इमारतीच्या काचाही फुटल्याने माेठी घबराट पसरली. या घटनेमुळे मार्केटमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यंानी व्यवसाय बंद ठेवले होते. सायंकाळी वाजेच्या सुमारास काही दुकानदारांनी व्यवसाय सुरू केल्यावरून वाद झाला. 
 
पुण्याच्या विशेष पथकाद्वारेही तपासणी 
या स्फोटाची तीव्रता पाहता पोलिस आयुक्तांनी पोलिस महासंचालकांनाही याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य पाहून स्फोटाच्या तपासणीसाठी पुण्याहून बाेलावलेल्या विशेष पथकांने घटनास्थळाची तपासणी करून नमुने घेतले. 
 
स्फोटाचा तपास करणार एनडीआरएफ 
स्फोटाची तीव्रता पाहता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पुणे येथून एनडीआरएफचे (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) पथक आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दिली. स्फोटासाठी काही रासायनिक पदार्थ वा अन्य वस्तूंचा वापर केला का, याबाबत पथक तपासणी करणार आहे. पथकाने शनिवारी सायंकाळी घटनास्थळी तपासणी करून नमुने घेतले. रविवारीही (दि. ८) हे पथक तपासणी करणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...