आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यातमूल्य रद्द तरी कांद्याचे दर 'जैसे थे'च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सध्या कांद्याचे निर्यातमूल्य शून्य असून, कांदा दराची ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. उन्हाळ कांद्याचे दर वाढल्याने केंद्राने निर्यातमूल्यात वाढ करून प्रति टन ७०० डॉलर केले होते. त्यानंतर कांदा निर्यातीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांना कमी दराने कांदा विक्री करावा लागत होता. या वेळी केंद्र शासनाच्या विरोधात व्यापारी, शेतकरी आणि विरोधकांनी आवाज उठवून निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी केली होती. परंतु, केंद्राने निर्यातमूल्य रद्द करून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एक सुखद धक्का दिला. त्यानंतर निर्यातीमध्ये वाढ होऊनही दर वाढले नसल्याने शेतकऱ्यांना सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न पडला आहे. मंगळवारी बाजारसमितीमध्ये कांदा प्रति क्विंटल ७०० ते १२०० रुपये तर सरासरी ९०० रुपये दराने विक्री झाला.

सध्या गुजरातमधील महुआ भागातील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने दिल्ली, हरियाणा आणि पंजाब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीस जात असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला कमी दर मिळत आहे. विकास सिंग, कांदा निर्यातदार

निर्यातमूल्य रद्द करून शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. परंतु, आवक वाढल्याने दरात घसरण होत आहे. परंतु ज्या कांद्याची प्रत चांगली आहे त्यांना चांगला दर मिळत आहे निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक

बाजार समितीमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरात घसरण होत आहे. निर्यातमूल्य रद्द झाल्याने निर्यात वाढल्यामुळे दर स्थिर आहेत. निर्यातमूल्य पूर्वीचेच असते तर कांदा प्रति क्विंटल १०० ते २०० रुपये दरावर आले असते. इम्तियाज पटेल, कांदा व्यापारी
बातम्या आणखी आहेत...