आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छडा लागला: मोबाइल चोर टोळीचा पर्दाफाश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- त्रिमूर्ती चौक येथे मोबाइल दुकानात झालेल्या चोरीचा एका दिवसात पोलिसांनी छडा लावून टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून मोबाइलसह ३.५ लाखांचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी जप्त केला.
गुरुवारी मध्यरात्री त्रिमूर्ती चौक येथील सारडा टेलिकॉम या मोबाइल दुकानाचे शटर तोडून विविध कंपन्यांचे लाख ३५ हजारांचे सुमारे ३५ मोबाइल एक लॅपटॉप चोरल्याची फिर्याद मनोज सारडा यांनी दाखल केली होती. अंबड पोलिसांनी तत्काळ विविध ठिकाणी सापळा रचून एका दिवसात चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीत वापरलेले वाहनही जप्त केला. आरोपी अमोल मोरे, सलमान शेख, अमिल शेख, शाहरुख शेख, राहुल मरसाळे, शहाबाज शेख यांना अटक केली.
पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपायुक्त विजय पाटील, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, डी. भोई, आश्विनी पाटील, अनिल दिघोळे, दतात्रय विसे, दतात्रय पाळदे, विष्णू उगले, परमेश्वर दराडे, उत्तम पवार, यादव डबाळे, रावजी मगर, दत्तू गारे, धनंजय दाभाडे, के. के. पानसरे, दुर्योधन कोळी आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
तत्काळ तपास केला
- या चोरीची माहिती मिळताच आमच्या संपूर्ण टीमने तत्काळ तपास केला आणि एका दिवसात चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दिनेश बर्डेकर, वरिष्ठ पो. निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...