आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमा मतदार याद्या दुरुस्तीसाठी अाज मुदत, अजून अजेंडाच पाेहाेचला नसल्याच्याही तक्रारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनची (निमा) द्वैवार्षिक निवडणूक सुरू झाली असून गुरुवारी (दि. ७) मतदार यादी दुरुस्तीची अंतिम मुदत अाहे. मतदार याद्या निमाच्या कार्यालयात प्रसिद्ध केल्या गेल्या अाहेत. मात्र अद्यापही निवडणुकीचा साधा अजेंडाही पाेहाेचला नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या अाहेत. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी अायमाप्रमाणेच रंगणार की काय, अशी चर्चा उद्याेग वर्तुळात सुरू झाली अाहे.

जिल्ह्यातील उद्याेजकांचे नेतृत्व करणाऱ्या अाणि त्यामुळेच महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या निमाची दर दाेन वर्षांनी निवडणूक हाेत असते. यंदाही ही रणधुमाळी सुरू झाली असून मतदार याद्या निमाच्या कार्यालयात प्रसिध्द केल्या गेल्या अाहेत, २७५० मतदार अापला मतदानाचा हक्क बजावणार अाहेत. जुलैपासून उमेदवारी अर्ज विक्रीही सुरू झाली असून गुरुवार, जुलै ही मतदार यादी दुरुस्तीकरीता अंतिम मुदत अाहे. १३ जुलैला सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुरुस्तीसह मतदारयादी प्रसिध्द केली जाणार अाहे. मात्र, असे असले तरी अद्याप निवडणूकीचा साधा अजेंडाही मिळाल्या नसल्याच्या गंभीर तक्रारी सभासदांनी सुरू केल्या अाहेत. त्यामुळे ही निवडणूकही अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या निवडणुकीप्रमाणेच गाजणार, अशी चिन्हे अाहेत.

सभासदांना प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न?
निमाच्याकाही अाजीव सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले अाहे. त्यात अाम्ही अाजीव सभासद असून वर्तमानपत्रातून निमाची निवडणूक जाहीर झाल्याचे समजले असून २७ जुनच्या अगाेदर निवडणूकीचे अधिकृत पत्र येणे अपेक्षित हाेते मात्र ते अद्यापही प्राप्त झाले नसल्याचे म्हटले अाहे. सभासदांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा पदाधिकाऱ्यांचा उद्देश अाहे का? असा सवालही त्यात उपस्थित केला गेला असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याचे अावाहन केले गेले अाहे. या निवेदनावर माेरया न्यूमाटीक्सचे माेहन सुतार, क्रिएटिव्ह पाॅवरटेकचे छबू नागरे, सीएस अाॅईल इंडस्ट्रीजचे सचिन तेजाळे, बाबुराव शिंदे यांच्या स्वाक्षरी अाहेत.
बातम्या आणखी आहेत...