आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Extension Of Three Months To Prime Minister Insurance Yojana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान विमा याेजनांना तीन महिन्यांची मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्याच्या उच्चांकानंतर सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान विमा योजनांना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून, अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश व्यक्ती या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
मे रोजी पंतप्रधान सुरक्षा विमा आणि पंतप्रधान जीवनज्योती विमा या दोन अभिनव योजना सुरू झाल्या. त्यानंतर जिल्ह्यात योजनेला मोठा प्रतिसाद मिळल्याचे दिसून आले होते. या दोन योजनांचे खाते उघडण्यासाठी ३१ मे २०१५ ही अंतिम तारीख होती. ३१ मेअखेर चार लाख व्यक्तींनी खाते उघडून विम्याचे संरक्षण मिळवले, परंतु अजूनही बहुतांश व्यक्ती या योजनेपासून वंचित राहिल्याने खाते उघडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या ६५ लाख असून, या विमा योजनांचे खाते उघडण्यासाठी शासनाने २१ दिवसच दिले होते. आता ३१ ऑगस्टपर्यंत या दोन्ही विमा योजनांचे खाते उघडू शकणार आहेत. यामुळे या विमा योजनेचा शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढविली आहे.
अशा आहेत विमा योजना
सुरक्षा विमा योजना : १२रुपये वार्षिक हप्ता, लाभार्थी वयोगट १८ ते ७०, जखमी झाल्यास एक लाख रुपये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये भरपाई, फक्त बँकेत खाते असणे आवश्यक, कोणीही लाभ घेऊ शकते, सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात, एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवता येणार, विमा उतरविणाऱ्याचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
जीवनज्योती विमा योजना : ३३०रुपये वार्षिक हप्ता लाभार्थी वयोगट १८ ते ५०, मृत्यू झाल्यास लाख रुपये भरपाई, फक्त बँकेत खाते असणे आवश्यक असून कोणीही या विमा योजनेचा लाभ घेऊ शकतो, एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बँकेतील बचत खात्याद्वारे हा विमा उतरवता येणार, विमा उतरविणाऱ्याचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
या विमा योजनांचे प्रथम वर्ष असल्याने देशातील सर्व लोकांना लाभ घेता यावा म्हणून खाते उघडण्यासाठी अतिरिक्त तीन महिने मुदत देण्यात आली आहे. मात्र, पुढील वर्षी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे बँकांनी शासन परिपत्रकानुसार स्पष्ट केले आहे. मे २०१५ ते जून २०१६ पर्यंत हे खाते वैध राहील.
- आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात चार लाख जणांनी या दोन्ही विका योजनांचा लाभ घेतला असून अद्याप ज्यांनी खाते उघडले नाही, अशा व्यक्ती ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत खाते उघडू शकणार आहे.
बी.एम. गिरासे, वरिष्ठ प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र