आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Extension Of Time Limit To Submit Documents Of Industry Demanded

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धिमा कारभारः ‘इमारत पूर्णत्व’साठी वर्षाची मुदतवाढ द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इमारत पूर्णत्व दाखल्यासाठी (बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट) एक वर्षाची सरसकट मुदतवाढ देण्याची मागणी उद्योजकांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली.

एमआयडीसीच्या मुख्यालयाच्या धिम्या कारभारामुळे अनेक उद्योजकांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात मुदतवाढीची परवानगी मिळाली असून, या मुदतवाढीकरिता दंडात्मक रक्कम त्याच कालावधीत एमआयडीसीने भरण्यास सांगितले आहे. मंदीच्या या कठीण कालखंडात एवढी रक्कम भरणे शक्य होत नसल्याकडे उद्योजकांनी लक्ष वेधले.

6 मार्च 2013 रोजी एमआयडीसीने घोषित केलेल्या विशेष मुदतवाढ योजनेंतर्गत ज्या उद्योजकांनी बांधकाम सुरू केले आहे किंवा पूर्ण केलेले आहे, त्यांना फायर एनओसीसारख्या अनेक परवानग्या प्राप्त करून कागदपत्रे जमा करण्यासाठी दोन महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ही मुदतवाढ सरसकट द्यावी, अशी मागणी निमाच्या वतीने शनिवारी एमआयडीसीकडे करण्यात आली. या वेळी निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, उपाध्यक्ष समीर पटवा, सरचिटणीस मंगेश पाटणकर, व्हिनस वाणी यांसह उद्योजकांच्या शिष्टमंडळाने खेडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तर, उद्योग संघटनांची मागणी वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे आश्वासन खेडकर यांनी दिले.

एमआयडीसीचे टोचले कान

एमआयडीसीचा मुख्य उद्देश हा उद्योगांची निर्मिती करणे, पायाभूत सुविधा पुरविणे, त्यांच्या अडीअडचणी सोडविणे तसेच उद्योगास पोषक वातावरण निर्माण करणे आहे. हा उद्देश समोर ठेवूनच आपण 20 ऑगस्ट रोजी काढलेले परिपत्रक औद्योगिक क्षेत्रासाठी लागू न करता नकाशे मंजुरी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला एका वर्षात विनाअट व विनाशुल्क देण्यात यावा, अशी मागणी उद्योजकांनी केली.