आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम. फार्मसी ‘सीईटी’ला मुदतवाढ, १३ मेपर्यंत सादर करता येणार अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ या मास्टर ऑफ फार्मसी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या १७ मे रोजी "एमएएच-एमपीएच-सीईटी' ही प्रवेश परीक्षा होणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून संचालनालयाने अर्ज भरण्याच्या विहित मुदतीत वाढ करण्यात आली असून, आता बुधवार (दि. १३ मे)पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार अाहे. बी. फार्मसी उत्तीर्ण तसेच शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असून, एआरसी केंद्रावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
एम. फार्मसी अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशपरीक्षा देणे अनिवार्य आहे. नाशिकमध्ये एम. फार्मसी अभ्यासक्रम असलेली १५ महाविद्यालये असून, त्यात ४५० जागा आहेत. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी हे अर्ज स्वीकृती केंद्र (एआरसी सेंटर) अाहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणी करण्याची संधी असून, १३ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पुणे, नागपूर आणि आैरंगाबाद या शहरांतील केंद्रावर १७ मे रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
४३० विद्यार्थ्यांचे अर्ज
एम.फार्मसी प्रवेश परीक्षेसाठी ४३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात बी. फार्मसी झालेल्या ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेत. तर, एआयसीटीईतर्फे घेण्यात आलेल्या ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट (जी पॅट) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ७० विद्यार्थ्यांनी एम. फार्मसीसाठी नोंदणी केली असून, त्यांना थेट प्रवेश मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना एम. फार्मसी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना एआयसीटीईकडून प्रति महिना १२,४०० रुपये विद्यावेतन मिळेल.
बातम्या आणखी आहेत...