आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदनासाठी लागणार वाढीव शुल्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांतील औषधोपचारांसाठी, तसेच निरनिराळ्या वैद्यकीय सुविधांसाठी शुल्कवाढीचा निर्णय वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. त्यानुसार शवविच्छेदन करण्यासाठी विच्छेदन झालेले मृतदेह शवागृहात ठेवण्यासाठीदेखील आता वाढीव शुल्क आकारले जाणार असल्याने या शुल्कवाढीचा फटका गरजू रुग्णांना बसणार आहे.

शासकीय रुग्णालयांत पुरविण्यात येणाऱ्या तपासणी सेवा त्याबाबतच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. हे शुल्क मागील १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून आकारण्यात येत आ हे. सध्या अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या राजीव गांधी जीवनदायीसारख्या योजनांचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही. शासन निर्णयान्वये शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयाप्रमाणे वैद्यकीय सेवांसाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. वाढ करण्यात आलेल्या रुग्णसेवांसह विच्छेदन झालेले मृतदेह शासकीय शवागृहात ठेवण्यासाठीदेखील शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी या सर्व सुविधा मोफत दिल्या जात होत्या. या शुल्कवाढीने मृतांच्या नातेवाइकांवर आर्थिक बोजा पडणार असून, सर्वाधिक आर्थिक फटका गरीब रुग्णांना बसणार आहे. या निर्णयामुळे मृतावर लागलीच अंत्यसंस्कार करणे हाच एकमेव पर्याय नातेवाइकांसमोर राहणार आहे. विभागात सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत विनाशवविच्छेदनासाठीदेखील १५०० रुपये शुल्क लागणार आहे. या शुल्कवाढीविरोधात विविध घटकांनी नाराजी व्यक्त करून ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

शवासाठीही शुल्क
खासगी संस्थांना अभ्यासक्रमासाठी शव देण्यासाठीही हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यासह कोल्ड प्रिझर्व्हेशनसाठीदेखील तासाप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.

..याप्रमाणे झाली आहे शुल्कवाढ
{विभागात सकाळी ते त्यापुढे शवविच्छेदनासह : हजार
{ सायंकाळी वाजेनंतर : हजार {शनविारी दुपारी वाजेनंतर विनाशवविच्छेदन : हजार, शवविच्छेदनासह : २५०० रुपये
{ रवविारी शासकीय सुटीच्या दविशी शवविच्छेदन - विनाशवविच्छेदन : हजार, विच्छेदनासह : २५०० रुपये
{ विभागाबाहेर सकाळी ते विनाशवविच्छेदन : हजार, शवविच्छेदनासह : ३५०० रुपये.