आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामाेर्चाला गाेल्फ क्लबवरून मिळणार सूचना, एसटीच्या ५० बसेसची आगाऊ नोंदणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोपर्डी अत्याचार विरोधासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी शहरातून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला जिल्हाभरातून मराठा बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. यासाठी एसटी विभागाकडूनही नियोजन केले असून, मोर्चात सहभागी होण्यासाठी ५० बसेसची आगाऊ नोंदणी करण्यात आली अाहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार बसेस सोडण्यात येणार आहेत. 
 
शनिवारी (दि. २४) माेर्चासाठी जिल्हाभरातून मराठा समाजबांधव येणार अाहेत. तपाेवनातून सुरू होणाऱ्या मोर्चासाठी शहरातून सकाळी वाजेपासून बससेवा सुरू केली जाणार आहे. तसेच, जिल्ह्यातूनही मोर्चासाठी येणाऱ्यांसाठी एसटी प्रशासनाकडून ज्या ठिकाणी मागणी होईल, त्या ठिकाणाहून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबरोबरच ग्रामीण भागातूनही मोर्चात सहभागी होण्यासाठी सटाणा येथून दोन, लासलगाव येथून पाच, मालेगाव येथून दोन, तर कळवण येथून चार बसेस, याबरोबरच विभागातून ५० बसेसची नोंदणी एसटी प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. मोर्चाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मोर्चा परतीच्या प्रवासाबाबतच्या वाहतुकीसाठी चालक वाहकांनादेखील प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

तपोवनापर्यंत बसेस जाण्याची व्यवस्था 
मोर्चेकरी प्रवासी यांच्यासाठी शहरातून सकाळी सहा वाजेपासून मोर्चा सुरू होईपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी तपाेवनापर्यंत बसेस चालविल्या जाणार आहेत. त्यात नाशिकरोड ते तपाेवनमार्गे नांदूर नाका, नाशिकरोड ते द्वारकामार्गे तपाेवन, श्रमिकनगर ते तपाेवन, उत्तमनगर ते तपोवन, ओझर ते तपाेवन मार्गांचा समावेश आहे. 

एके- १२४० कामगारनगर विक्रांत मते 
एके ०८४६ मधुर स्विटस, सावरकरनगर दीपक चव्हाण 
एके ०९९६ निर्मला काॅन्व्हेंट गाेकुळ पिंगळे 
एके-९९६ कृषीनगर जाॅगिंग ट्रॅक अमाेल गांगुर्डे 
एके १३९२ करी लिव्ज‌्, जेहान सर्कल प्रतिभा हाेळकर 
एफ- ०६६२ श्रीरंगनगर, गंगापूरराेड शरद देवरे 
एफ - ०६६३ हाेरायझन स्कूल अनुपमा सूर्यवंशी 
एफ- ०६६४ अाकाशवाणी टाॅवर किशाेर शिरसाठ 
एफ- ०६६७ येवलेकर मळा, श्रध्दा माॅल शरद येवलेकर 
-- रावसाहेब थाेरात हाॅल मुकूल भाेसले 
-- तुळजा भवानी मंदिर किशाेर शिरसाठ 
-- पंडित काॅलनी (ऋषिकेश हाॅस्पिटल) डाॅ. भाऊसाहेब माेरे 

{ मविप्रच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी रावसाहेब थाेरात सभागृहापासून सकाळी ८.३० वाजता बसची व्यवस्था करण्यात अाली अाहे. 
{ गंगापूरराेड काॅलेजराेड परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिकांसाठीची बस व्यवस्था 
 
शहरांतर्गत बससेवा अाणि संपर्कासाठी व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे... 
 
जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजातील बांधवांना मराठा क्रांती मोर्चाचे साहित्य वितरण करण्यात अाले अाहे. आतापर्यंत चार लाख गोल स्टिकर, लाख चौकोनी स्टिकर २० लाख हॅण्डबिलांचे वितरण करण्यात अाले अाहे. यापुढील जबाबदारी आता कंट्रोल रूमची आहे. संपूर्ण मोर्चाला सूचना देण्याचं काम गोल्फ क्लब येथील कंट्रोल रूमवरून स्वयंसेवक दर्शन पाटील करणार आहेत. वैद्यकीय सेवा, पाणी, तत्काळ मदत अादींबाबत सूचना गाेल्फ क्लब येथील कंट्राेल रूमवरून देण्यात येणार अाहेत. 

माेर्चाचा क्रम असा... 
विद्यार्थी-महिला-वकील, डाॅक्टर, बांधकाम व्यावसायिक - अभियंते-समाजातील प्रतिष्ठित नागरिक-संघटनेचे पदाधिकारी - राजकीय पुढारी. 

नाशिकमध्ये कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चाची अभूतपूर्व तयारी करण्यात आली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सकल मराठा समाजापर्यंत प्रचार प्रसार करण्यात आला. मराठा समाजाच्या बांधवांनी दुचाकींसह मोठ्या गाड्यांवर मराठा क्रांती मोर्चाचे स्टिकर लावले आहेत. तपोवन ते गोल्फ क्लब या मोर्चा मार्गावर भगवे झेंड्यांनी अवघे शहर भगवेमय झाले आहे. व्हॉट‌्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरही केवळ मोर्चाची चर्चा सुरू आहे. 

प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी द्वारका चौक, मीनाताई ठाकरे स्टेडियम, मायको सर्कल िबटको चौक येथे वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या ठिकाणी माेर्चासाठी उपस्थित बांधवांना वाहतुकीसंदर्भात माहिती मिळू शकेल. 

{ग्रामीण बससेवा : डोंगरेवसतिगृह येथून ओझर, मालेगाव, सटाणा, पेठ, कळवण, पिंपळगाव, मनमाड, नांदगाव येवला येथे जाणाऱ्या बसेस चाेपडा लॉन्स, रासबिहारीमार्गे पाठवून प्रवाशांची सोय करण्यात येणार आहे. 

{मुंबई, पुणे या ठिकाणाी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच धुळे मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांसाठी मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ बसेस थांबणार आहेत. 

{साक्री-नंदुरबारकडून पुण्याकडे जाणाऱ्या बसेस द्वारका पुलावरून उतरतील पुणे हायवेने नाशिकरोडमार्गे जातील. 

{अहमदनगर ते सेल्व्हास जाणाऱ्या बसेस नाशिकरोड, पाथर्डीरोड-अंबड लिंकरोड ते त्र्यंबकेश्वरकडे जातील. 

{मुंबईकडून धुळेकडे जाणाऱ्या बसेस महामार्ग बसस्थानकावरून द्वारका उड्डाणपुलावरून जातील. 

{ पुणे मार्गाकडे जाणाऱ्या सर्व बसेस या महामार्ग बसस्थानकावरून जातील. 
{शहर बससेवा : महामार्ग बसस्थानकावरून तपोवन, सिन्नर, नाशिकराेड, आेझर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी शहर बस वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मायको सर्कल डोंगरे वसतिगृह येथून श्रमिकनगर, उत्तमनगर, गिरणारे अादी मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 
बातम्या आणखी आहेत...