आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंहस्थात शहराला अतिरिक्त 500 दशलक्ष लिटर पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारे साधू-महंत आणि भाविकांची संख्या लक्षात घेता या काळात 130 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. म्हणजेच या काळात शहरात 500 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळयाचे नियोजन महापालिकेच्या पातळीवर सुरूअसून, या काळात शहरात लक्षावधी भाविक आणि साधू येण्याची शक्यता आहे. सध्या नाशिककरांसाठी दररोज 150 लिटर प्रतिव्यक्तीप्रमाणे पाणीपुरवठा केला जातो. अशा प्रकारे शहरात सुमारे 370 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सिंहस्थ काळात शहरात मोठय़ा प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यात साधू-संतांचाही समावेश असेल. हे भाविक आणि साधू पूर्ण क्षमतेने पाण्याचा वापर जरी करणार नसले तरीही त्यांच्या गरजेनुसार साधारणत: 30 ते 35 लिटर पाणी प्रतिव्यक्ती वापरण्यात येईल, अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे.

सिंहस्थ कालावधीतील पाणीपुरवठा

0सन 2015 ची अनुमानित लोकसंख्या : 18 लाख

0शहराची अनुमानित पाणी मागणी : 370 दशलक्ष लिटर प्रतिदिन

0साधुग्रामकरिता अनुमानित मागणी : 30 दशलक्ष लिटर प्रतिदिन

0लोकसंख्ये(भाविक)नुसार अनुमानित पाणी मागणी (पर्वणी दिवसासहित) : 72 दशलक्ष लिटर प्रतिदिन.

0एकूण पाणीपुरवठा मागणी : 472 दशलक्ष लिटर प्रतिदिन

0नवीन नियोजनानुसार पाणी मागणी : 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन