आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्रदानासाठी विद्यार्थ्यांची नाटिकेद्वारे जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सर्वश्रेष्ठसमजले जाणारे नेत्रदान करण्याचे भाग्य प्रत्येकाने पदरी पाडून घ्यावे. कारण आपण केलेल्या नेत्रदानामुळे नेत्रहीन व्यक्तीदेखील या सुंदर सृष्टीचे विलोभनीय दृश्य बघू शकते.
मृत्यूपश्चात आपण कुणाच्या तरी आयुष्यातील अंधकार दूर करू शकतो, हा एकमेव विचार डोळ्यापुढे ठेवून प्रत्येकाने नेत्रदान करावे, असा लाख मोलाचा संदेश इ. एस. आय. हॉस्पिटल नाशिक नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाटिकेद्वारे देण्यात आला.

सातपूर येथील इ.एस.आय. हॉस्पिटलच्या आवारात झालेल्या या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गवळी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गिरीश नेहते नाशिक नर्सिंगच्या प्रमुख डॉ. मनीषा पवार उपस्थित होत्या. या वेळी नाशिक नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी मरणासन्न अवस्थेत असलेल्या आजीच्या भूमिकेतून नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी अर्ज कसा करावा, यासह नेत्रदानासाठी आवश्यक सर्व माहितीही या नाटिकेद्वारे उपस्थितांना देण्यात आली.

१५-२० मिनिटांची प्रक्रिया
लहानमुलांपासून कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. फक्त एच.आय.व्ही. बाधीत हिपॅटायसीस बी आजार असलेली व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत बुबूळ काढावेत. ही प्रक्रिया २० मिनिटांची आहे. -डॉ.अरुण चव्हाण, वैद्यकीयअधीक्षक
शस्त्रक्रियेचालाभ

लहानमुलांच्या डोळ्यात चुना गेल्यावर डोळ्यात झाडाची फांदी अथवा इतर काही कारणाने इजा झाल्यास बुबूळ बसवावे लागते. ‘विटामीन ए’ची कमतरता असलेल्या रुग्णांनाही या शस्त्रक्रियेचा लाभ होतो. जन्मताच अंध असलेल्या व्यक्तींवर मात्र या शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही. डॉ.गिरीश नेहते, नेत्ररोगतज्ज्ञ,इ.एस.आय.