आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरील देशी-विदेशी चलन विनिमय कार्यालयात गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या धाडसी घरफोडीचा पुणे पोलिसांच्या मदतीने छडा लावण्यात गुन्हे शोध पथकास यश आले आहे. यामध्ये पोलिसांनी सुमारे एक कोटी 35 लाखांचा माल जप्त केला असून, गुन्ह्यातील फिर्यादी तथा कंपनीचा व्यवस्थापक सागर चिटणीस हाच मुख्य संशयित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी चिटणीस याच्यासह सात जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 11 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तिबेटीयन मार्केटसमोरील सुमंगल प्लाझा इमारतीतील ‘सेंट्रम’ डायरेक्ट कंपनीचे कार्यालय असून, या कार्यालयाचे शटर वाकवून चोरट्यांनी तिजोरी पळवीत सुमारे 32 लाखांची देशी-विदेशी चलन व विदेशी बॅँकांचे सुमारे एक कोटीचे ट्रव्हलर्स चेक लांबविल्याची घटना 15 ऑक्टोबर 2012 रोजी घडली. या कार्यालयाचा व्यवस्थापक चिटणीस (रा. वडाळा-पाथर्डीरोड, इंदिरानगर) यांच्या तक्रारीनुसार, सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सराईत गुन्हेगार
अटक केलेल्यांमध्ये संशयित सागर चिटणीस, कल्पेश जठार हे दोघे वगळता विजय रघुनाथ शिंदे (मुंबई) स्वप्नील सातपुते, भरत मोरे (रा. कोल्हापूर) आशिष शेवाळे, फिरोज मुल्ला यांना पुणे येथे अटक केली. यातील पाचही संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. उपआयुक्त संदीप दिवाण, निरीक्षक महाजन, खगेंद्र टेंभेकर, हवालदार विनायक खांडरे, दिलीप ढुमने, गणेश भामरे, पंकज पळशीकर, बाळकृष्ण सोनवणे, संतोष चित्ते, गणेश घारे, चंदू जाधव, संजय जाधव यांनी कारवाई केली.