आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभपर्व: तपाेवन नंतरच्या घाटांवरील भाविकांचे स्नान गाेत्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: तपाेवन अाणि टाकळीच्या एसटीपीतून निघाल्यानंतर दसकच्या घाटापर्यंत पाेहाेचलेल्या पाण्याची अवस्था अशी भीषण अाहे.
महापालिकेने उभारलेल्या मलजलशुद्धीकरण केंद्रांच्या कार्यक्षमतेवर भिस्त ठेवून महापालिकेने त्यांच्या पुढील घाटांवर भाविकांच्या स्नानाची साेय केली अाहे. मात्र, त्यातील तपाेवनचा प्रकल्प अाणि टाकळीचा एक प्रकल्प सुुरू असला तरी त्यातून बाहेर पडणा-या पाण्याची स्थिती बघितल्यानंतर हे पाणी शुद्धीकृत अाहे, असे कुणीही ‘सश्रद्ध भाविक’ देखील मान्य करणार नाही. या केंद्रांतून थेट नदीत जाणा-या पाण्याच्या गुणवत्तेवर नजर ठेवणारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणाच सातत्याने निकष बदलत अाहे. त्यामुळे या केंद्रातून बाहेर पडणारे पाणी ‘शुद्धच’ असल्याचा संबंधितांचा दावा खरा मानणे इतकेच सामान्यांच्या हातात उरणारे असून कुंभमेळ्याच्या दृष्टीने हे वास्तव माेठे विदारक अाहे.

दसक घाटावर पाेहाेचते दुर्गंधीयुक्त पाणी
टाकळीच्याएसटीपीतून बाहेर पडणारे पाणी अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या दसकच्या पुलाखाली बांधलेल्या घाटांपर्यंत पाेहाेचते. तिथे तर पुलाचे काम अद्यापही सुरूच असून, घाटाच्या कामाचा मलबा नदीपात्रात तसाच पडून असण्याचा प्रकारदेखील अाहेत. त्याशिवाय दसकला पाेहाेचणा-या पाण्याला फेसासह दुर्गंधी असल्याने जेव्हा भाविकांना स्नानासाठी घाटावर अाणले जाईल, तेव्हा भाविकांचा संताप हाेणे हे निश्चित अाहे.