आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणीस ग्रुपकडून सुमारे १०० कोटींची फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात आर्थिक अपहाराचे प्रकार कमी होण्याचे काही चिन्हे नाहीत. पुणे येथील फडणीस ग्रुपच्या संचालकांनी शहरातील सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांचा सुमारे शंभर कोटींचा अपहार केल्याची तक्रार ग्रुपच्या गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्त आणि सरकारवाडा पोलिसांत केली. मंगळवारी (दि. २०) सायंकाळी ग्रुपच्या दीडशे गुंतवणूकदारांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेत संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
फडणीस ग्रुपच्या गुंतवणूकदारांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार फडणीस ग्रुपच्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर, फडणीस प्रॉपर्टीज, फडणीस रिसोर्ट आणि स्पा इंडिया या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास रिझर्व्ह बँकेच्या व्याजापेक्षा एक-दोन टक्के व्याज आणि गुंतवणूक केलेल्या ठेवीवर कंपनीला झालेल्या नफ्याच्या काही टक्के रक्कम दरमहा देण्याचे अामिष दाखवत सुमारे शंभर कोटींचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संचालक विनय फडणीस यांनी २५ जुलैला तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या समोर सर्व गुंतवणूकदारांचे पैसे मासिक हप्त्याप्रमाणे परत देण्याचे अाश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी शहरात सर्व ठेवीदारांची बैठक घेत अलिबाग येथील पंचतारांकित हॉटेल विक्री करून सर्व पैसे देण्याचे अाश्वासन दिले होते. अाश्वासनाला चार महिने उलटले. संचालकांकडून दिशाभूल केली जात असल्याने संतप्त ठेवीदारांनी मंगळवारी पोलिसांत धाव घेतली. कंपनीचे संचालक सर्वसामान्य ठेवीदारांच्या जिवावर कमवलेली स्थावर आणि जंगम मालमत्तेची विल्हेवाट लावून परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या २१ इतर संलग्न कंपन्या आहेत. यामध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक केली आहे. संचालक गुंतवणूकदारांना धमकावत असून, पोलिसांत अथवा न्यायालयात तक्रार केल्यास पैसे देणार नसल्याची धमकी गुंतवणूकदारांनी दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. कंपनीचे विनय प्रभाकर फडणीस, अनुराधा विनय फडणीस, सायली गडकरी, शरयू ठकार, भाग्यश्री गुरव या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी गुंतवणूकदारांनी पोलिसांत केली आहे.

आर्थिकगुन्हे शाखा संशयाच्या भोवऱ्यात :फडणीस ग्रुपच्या विरोधात तक्रार अर्ज आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. मात्र, संचालकांच्या प्रलोभनानंतर हा तपास थंडावला. काही दिवसांपूर्वी या शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकाला गुंतवणूकदार महिलांना घेराव घातला होता. संचालकांशी संपर्क साधला असता या अधिकाऱ्याला प्रतिसाद दिल्याने अधिकाऱ्याने गुंतवणूकदारांना तुम्हा सर्व रस्ते मोकळे असल्याचे सांगितले. १० एप्रिलपासून गुंतवणूकदार पोलिसांत चक्कर मारत आहेत. मात्र, संबंधित शाखेने याकडे दुर्लक्ष केल्याने तपासाबाबात गुंतवणूकदारांनी संशय व्यक्त केला.

मैत्रेयप्रमाणे मिळाव्या ठेवी परत
^पोलिसांनी मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना ज्या प्रकारे पैसे परत दिले त्याप्रमाणे संचालकांवर गुन्हे दाखल करून एस्क्रो खात्यामार्फत पैसे परत द्यावे. गंुतवणूकदार बहुतांशी सामान्य कुटुंबातील आहेत. सेवानिवृत्त अधिक आहेत. या गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यासाठी संचालकांवर कारवाई करावी. -के. पी. राव, गुंतवणूकदार
बातम्या आणखी आहेत...