आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांनी फुंकला महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा बिगुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुका हेच लक्ष्य ठेवून पदाधिकाऱ्यांनी तयारीस लागावे. पुढच्या वेळी भाजपच्या महापाैरांचा सत्कारा करायला बाेलवा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीतील भाजप निवडणूक तयारीचा बिगुल फुंकला.येथील स्वामीनारायण मंदिराच्या सहजानंद सभागृहात भाजप पदाधिकारी अाणि विद्यमान नगरसेवकांच्या बैठकीत बाेलताना मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानमंत्र दिला. स्थानिक स्तरावर युती करायची की नाही, त्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच घ्यायचा असून, तुम्ही घ्याल त्या निर्णयामागे अाम्ही उभे राहू.

कुणालाही परके मानू नका : पक्ष विस्तारा वेळीअनेक नवनवीन घटक त्यात सहभागी हाेत असतात. त्यातील कुणालाही परके समजू नका. दुसऱ्या पक्षांमधून अालेल्यांनीही काहीतरी चांगले काम केलेलेच असते. त्यांनी काहीतरी सामाजिक काम केलेले असल्यामुळेच त्यांना संघटनेत स्थान देण्यात अाले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तुम्ही मन माेठे केले तरच पक्ष माेठा हाेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अन्य संघटना प्रायव्हेट प्राॅपर्टी : राज्यातील अन्य संघटना या प्रायव्हेट प्राॅपर्टी असल्या तरी अापला पक्ष तसा नाही. अापल्या पक्षात प्रत्येक पदाधिकारी अाणि कार्यकर्त्याचे मत एेकून घेतले जाते. हे अापल्या पक्षाचे वैशिष्ट्य असल्यामुळेच कुणीही सामान्य कार्यकर्ता या पक्षात सर्वाेच्च स्थानापर्यंत पाेहाेचू शकतो, असे सांगत फडणवीस यांनी अन्य पक्षांनाही टाेला लगावला.

विजेत्यांचा सत्कार, दाेघांचा पक्षप्रवेश : यावेळी नाशिकराेडहून निवडून अालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सुनंदा माेरे अाणि मंदा ढिकले यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात अाला. तसेच, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकार

हवेत राहू नका :
पक्षाला अनुकूल दिवस अाहेत म्हणून कुणीही हवेत राहू नका. प्रत्येक कार्यकर्ता अाणि पदाधिकाऱ्याने बूथरचनेपासूनच्या ग्राउंडवर्कमध्ये कुठेही उणीव राहू देऊ नका. लाेकांची नाडी अाेळखा. त्यांच्याशी असलेला संपर्क कुठेही कमी हाेऊ देऊ नका. नेते अाले, त्यांनी भाषणे केली म्हणजे अापली जबाबदारी संपली अशा भ्रमात कुणीही राहू नका. सामान्य माणसे स्थानिक कार्यकर्त्यांना अाेळखत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहा. अामदारकी, खासदारकीपेक्षा ही निवडणूक खूप वेगळी असते, हे सतत लक्षात ठेवावे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...