आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अनुत्तीर्ण’ विद्यार्थिनी आली शहरात प्रथम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पॉलिटेक्निकच्या एकाच विषयात अनेक वदि्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा प्रकार ताजा असताना आता डी. फार्मसीच्या निकालातही अक्षम्य चुका झाल्या आहेत. अनेक हुशार वदि्यार्थ्यांना एमएसबीटीईच्या (महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन) ढिसाळ कारभाराचा फटका बसून, त्यांच्यावर ‘नापास’चा शिक्का बसला. विशेष म्हणजे, निकालात केवळ १६ गुण दिलेल्या मोहनिी घुले या वदि्यार्थनिीला प्रत्यक्षात पडताळणीनंतर ६१ गुण मिळाल्याचे स्पष्ट होऊन ती केवळ महावदि्यालयातच नव्हे, तर शहरातील फार्मसी कॉलेजांत टॉपर ठरली आहे.

पॉलिटेक्निक डी. फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा एमएसबीटीईतर्फे घेण्यात येतात. डी. फार्मसी परीक्षेच्या निकालांतही अनेक चुका झाल्या असून, अनेक वदि्यार्थ्यांचे सदोष निकाल दिले गेले आहेत. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची प्रथम वर्षाची वदि्यार्थी मोनिका घुले हिला फार्मास्युटिक्स या विषयात केवळ १६ गुण मिळाल्याचे गुणपत्रिकेत दर्शविण्यात आले.अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मोनिकाने गुण पडताळणीसाठी अर्ज केला. त्यानंतर तिला त्याच विषयात तब्बल ६१ गुण मिळाले. मोनिकाबरोबरच अनेक वदि्यार्थ्यांचेही गुण पडताळणीनंतर वाढले आहेत. मोनिकाला एकूण ८३.७५ टक्के गुण मिळाले असून, शहरात ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

योग्यकाळजी हवी : पॉलिटेक्निकच्याइलेक्ट्रिकल शाखेतील तृतीय वर्षाच्या निकालातही गोंधळ झाला होता. गुणपडताळणीनंतर त्यातील बहुतांश वदि्यार्थी उत्तीर्ण झाले. एमएसबीटीईकडून वारंवार चुका होत असल्याने वदि्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. निकाल जाहीर करताना काळजी घेतली जावी, अशी मागणी एशियन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डी. के. पाटील यांनी केली.

..तर एक वर्ष नाहक वाया गेले असते
निकालजाहीर झाल्यानंतर सर्व विषयांचे गुण पाहिले, तर विश्वासच बसला नाही. फार्मास्युटिक्स-१ या विषयात तर फक्त १६ गुण मिळाले. गुणपडताळणीसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्षात ६१ गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले. गुणपडताळणी केली नसती तर वर्ष वाया गेले असते. मोनिकाघुले, वदि्यार्थनिी
बातम्या आणखी आहेत...