आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faith Always Maintained The Absolute Need . Deshpande

प्रामाणिकपणा कायम राखण्याची नितांत गरज- न्या. देशपांडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-समाजात अनेक प्रकारच्या व्यक्तींशी आपला संबंध येतो. अशा स्थितीत स्वत:मधला प्रामाणिकपणा कायम राखण्याची नितांत गरज असते, असे प्रतिपादन न्यायमूर्ती प्रमोदराव देशपांडे यांनी केले.
पूर्णवाद विद्या कला नीती पुरस्कार सोहळा गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी र्शीकांतशास्त्री दीक्षित यांना पूर्णवाद वेदमूर्ती, सुभाष दसककर यांना पूर्णवाद संगीत उपासक, तर गुलजारसिंग राजपूत यांना पूर्णवाद सत्यबोध समाजभूषण हे पुरस्कार देण्यात आले.
पुरस्कार्थींच्या वतीने राजपूत म्हणाले, ‘ज्ञान, कर्म आणि उपासनेने माणसाचे जीवन बदलत असल्याने मनुष्याने जीवनात त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. ज्यामध्ये सत्याचा बोध घडवून आणण्याची क्रांती आहे, तो म्हणजे पूर्णवाद होय.’ या वेळी अँड. विष्णू महाराज पारनेरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पूर्णवाद परिवारातर्फे प. पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी कार्यक्रमास प्रारंभ झाला. 28 जानेवारीपर्यंत यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, रविवारी (दि. 26) सकाळी 9 वाजता शिवराम मंदिर, म्हसरूळ येथे ‘पूर्णवाद संसदीय कामकाज’ विषयावर व्याख्यान, दुपारी वाजता लक्ष्मीकांत पारनेरकर यांचे ‘पूर्णवादी संसद व त्यांची कार्यपद्धती’ या विषयावर व्याख्यान व दुपारी 4.30 वाजता गुणेश पारनेरकर यांचे ‘शिवराम चळवळ : काल, आज, उद्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (दि. 27) सायंकाळी 7.30 वाजता मधुरा बेळे, देविका काशीकर, र्शीराम तत्त्ववादी यांच्या गायनाची मैफल होईल.