आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताेतया अायपीएसला पळसे गावात अटक, पंतप्रधान कार्यालयात असल्याची करीत हाेता बतावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाेलिस अधिकाऱ्याच्या वेशातील छायाचित्रे साेशल मीडियावर टाकून पंतप्रधान कार्यालयात अायपी एस अधिकारी असल्याची बतावणी करीत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अभिजीत विजय पानसरे या युवकास गुरुवारी (दि. ९) सायंकाळी पळसे येथील त्याच्या घरातून अटक करण्यात अाली. 
 
अभिजितने फेसबुक, व्हाॅट्सअप या साेशल मीडियावर पाेलिस अधिकाऱ्याच्या वर्दीतील फाेटाे ठेवले हाेते. दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात कामाला असल्याचे सांगून ताे सामान्य नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास अाले.
 
त्याच्या घरी जाऊन साध्या वेशातील पाेलिसांनी कुरिअर अाल्याचे सांगून त्याला घराबाहेर बाेलावत अटक केली. नाशिकराेडचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पंढरीनाथ ढाेकणे, सहायक निरीक्षक एस. एन. भुजबळ, कय्युम सय्यद, महेश साळवे यांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिकराेड पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते. 
बातम्या आणखी आहेत...