आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार भासविणारा संशयित अपघातात ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/सिडको- राष्ट्रपतींकडून खासदारकीसाठी निवड झाल्याची खोटी कागदपत्रे बनवितानाच वाहनावर लाल-अंबर दिवा वापरून फसवणूक करणारा संशयित आरोपी अपघातात ठार झाला. अंबड पोलिस अनेक गंभीर गुन्ह्यांत फरार असलेल्या या संशयिताच्या शोधात होते.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे संशयित वीरेंद्र प्रकाश शिंदे (वय ३८. त्यावेळी शुभम पार्क, उत्तमनगर येथे राहणारा) हा स्विफ्ट कारने नाशिकहून मुंबईकडे जात होता. इगतपुरीजवळ एका कंटेनर कार अपघातात शिंदे ठार झाला. त्याच्यावर अंबड पोलिसांसह जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होते. अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळत होता. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले होते. यासंदर्भात पोलिसांनी विविध पथके तयार करून थेट दिल्ली, संसद भवन राष्ट्रपती भवनापर्यंत चौकशी केली होती. त्यात अनेक कार्यालयांची खोटी कागदपत्रे बनवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचेही समोर आले होते. फरार असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलिस उपनिरीक्षक महेश इंगोले तपास करत आहेत.

जेलरोडवरीलदहा वर्षीय मुलाचा रामकुंडात बुडून मृत्यू
नाशिक- गोदाघाटावरील रामकुंडावर देवदर्शनासाठी आलेल्या दहा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित संजय मगर (वय १०, रा. सैलानीबाबा दर्ग्याजवळ, जेलरोड, नाशिक) हा आंघोळीसाठी रामकुंडावर गेला असताना, पाय निसटून पाण्यात पडला. सुमित आपल्यासोबत नसल्याचे वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्याचा मृतदेह रामकुंडात आढळून आला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.