आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्म्या किमतीत अस्सल साेन्याचे अामिष;बाेगस विक्रेत्यांची शक्कल, नागरिकांना क्लेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून मोठा अार्थिक फायदा मिळवा,’ असे आमिष दाखवत फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समाेर येत आहेत. त्यात अनेकांना तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागली आहे, तुम्हाला लकी कस्टमर म्हणून निवडण्यात आल्याचे सांगत अनेकांना अार्थिक गंडा घातल्याचीही उदाहरणे अाहेत. असे असताना आता थेट नागरिकांना आमच्या शेतात पुरातन काळातील सोन्याची बिस्किटे, साेन्याचे विविध दागिने असलेला हंडा सापडला अाहे. तुम्हाला अगदी कमी किमतीत सोन्याच्या या वस्तू विक्री करण्याचे आमिष दाखविले जात आहे. विशेष म्हणजे राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या ठिकाणांहून असे दूरध्वनीवरून थेट स्थानिक नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर फोन येत असल्याने त्यांना हे क्रमांक कसे मिळत असतील, याबाबत तपास करण्यात असमर्थ ठरणाऱ्या पोलिसांच्या सायबर क्राइम विभागापुढे अाता अाव्हान उभे ठाकले आहे.
मारहाण अाणि लुटीचे वाढले प्रकार...
फाेन करून कमी किमतीत साेने देण्याचे अामिष दाखवणाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकार घडतात. संबंधित नागरिकाला पैसे घेऊन एकांतात बाेलावले जाते अाणि साेने देता उलट त्याला मारहाण करून त्याच्याकडील पैसे लुटले जात असल्याचे अाजवर घडलेल्या घटनांतून समाेर अाले अाहे.

नगरच्या स्थानिक गुन्हेगाराचा सहभाग उघडकीस
गेल्याच आठवड्यात शहरातील काही व्यक्तींना सोने विकायचे असल्याबाबत राज्यातील अहमदनगर येथून दूरध्वनी येत असल्याचे समाेर अाले हाेते. याबाबत संबंधित नागरिकाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची खाेलवर चौकशी केली. असे साेने विकण्याचे आमिष देणाऱ्यांमध्ये नगर येथील काही स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे त्यावेळी तपासात समोर अाले होते. दरम्यान, मागील वर्षी एका व्यक्तीला नकली सोने विकून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. यानंतर अाता पुन्हा ही टाेळी सक्रिय झाली असल्याची चर्चा असून, नागरिकांना असे फाेन येण्याचे प्रकार पुन्हा वाढत अाहेत.

बदनामी टाळण्यासाठी तक्रार देण्यास टाळाटाळ
अगदी कमी किमतीत सोने मिळत असल्याने नागरिक या आमिषाला सहजपणे बळी पडतात. मात्र, या सोन्याच्या वस्तू वा साेने घेताना अनेकदा नकली सोने माथी मारले जाते किंवा पैसे घेऊन मारहाणीचे प्रकारदेखील घडतात. अाजवर अशी अनेक प्रकरणे घडली अाहेत.परंतु, आपली फसवणूक झाली किंवा नकली सोने मिळाले अशी बदनामी होऊ नये यासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तींकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यास बऱ्याचदा टाळाटाळच केली जात असल्याचे समाेर अाले अाहे. परिणामी, पोलिसांनाही अशा प्रकरणांमध्ये तपास करणे वा संबंधित गुन्हेगारांना बेड्या घालणे अवघड हाेऊन जाते.

तातडीने तक्रार केल्यास प्रकरण उघडकीस...
आडगाव येथील एका नागरिकाची सोन्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पाथर्डी फाटा येथे कारवाई करत अशा प्रकारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद केली होती. मात्र, या प्रकरणात फसवणूक झालेल्या संबंधित नागरिकाने तातडीने पाेलिसांत तक्रार केल्याने हे यश मिळाले असल्याचे पाेलिसांनीही सांगितले.

अर्ध्या किमतीत मिळते सोने..?
‘आमच्या शेतामध्ये खोदकाम करताना हंड्यांमध्ये सोने सापडले आहे. आम्हाला पैशाची गरज असल्याने अगदी कमी किमतीत हे सोने विकायचे आहे. तुमच्या नातेवाइकाने आम्हाला तुमचा नंबर दिला आहे. आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही बिनधास्त पैसे घेऊन या, तुम्हाला लगेच सोने मिळून जाईल,’ असे शब्द कानी पडताच धनदांडग्यांच्या तोंडात पाणी येते अाणि क्षणार्धात ते अर्ध्या किमतीत मिळणारे हे साेने खरेदी करण्यासाठी तयार हाेतात. यामुळे अापसूकच सावज जाळ्यात अडकते अाणि माेठी फसवणूक हाेते.

फाेनद्वारे फसवणूक...
^अनेक दिवसांपासूनसाेने विक्रीबाबत फाेन येत असून, पैशांची गरज असल्याचे सांगितले जात अाहे. अाम्ही याबाबत तातडीने पाेलिसांत संपर्क केला अाहे. -एक नागरिक

पोलिसांचे आवाहन; नागरिकांचे दुर्लक्षच
कमी किमतीत सोने विकायचे आहे, शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे, अशा संदेश वा फाेनकडे दुर्लक्ष करून पाेलिसांत तक्रार करण्याचे अावाहन पाेलिस करीत असतानाही नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे समाेर येत अाहे. मुख्य म्हणजे, अाजवर अनेक प्रकरणांमध्ये संबंधितांनी तक्रारी केल्याने तपासात अडचणी अाल्याचे समाेर अाले अाहे.
‘तुम्हाला हजारो रुपयांची लॉटरी लागली अाहे’, ‘काेड स्क्रॅच करा, तुम्ही काेट्यवधी रुपयांचे धनी व्हाल’, ‘तुम्हाला लकी कस्टमर म्हणून कार गिफ्ट देणार’ अशी एक ना अनेक आमिषे एसएमएस वा इ-मेल्सच्या सहाय्याने दाखवून नागरिकांना गंडवण्याचे प्रकार वाढत असतानाच अाता नवीनच प्रकार समाेर येत अाहे. ‘शेतीत सोन्याचे बिस्कीट, हंडा सापडला असून, तुम्हाला कमी किमतीत हवे असल्यास संपर्क साधा’, असे सांगत धनदांडग्यांना फसवण्याची शक्कल वापरली जात असल्याची अनेक उदाहरणे समाेर अाली अाहेत. या प्रकरणी िकत्येक जण केवळ बदनामी होऊ नये म्हणून पोलिसांत तक्रार दाखल करण्यास धजावत नाहीत. परिणामी, असे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले अाहेत. पाेलिस प्रशासनासमाेर अाव्हान ठरू पाहणाऱ्या या नव्या फंड्यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
{ कमी किंमत मिळणाऱ्या सोन्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पाेलिसांकडून काय उपाययाेजना केल्या जात अाहेत?
-सोने कमी किमतीत विकणे किंवा शेतात सोने सापडले असे दूरध्वनी येणे अादी बाबींवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी याला बळी पडता सर्वप्रथम पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी.
{फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून काय ठाेस पावले उचलली जात अाहेत?
-याबाबत विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करावी, तातडीने कारवाई केली जाईल.
{परराज्यातून अशा स्वरूपाचे दूरध्वनी येत असल्याचे समाेर येत आहे. त्याचे काय?
-याबाबत कोणी तक्रार केल्यास त्याचा तपास संबंधित विभागाद्वारे करण्यात येऊन पुढील कारवाई केली जाते.
बातम्या आणखी आहेत...