आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न करणा-याला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - दिल्लीतील फर्मशी संबंध नसतानाही सुमारे दोन कोटी 17 लाख 72 हजार 782 रुपयांचा बनावट चेक तयार करून आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा करून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली.

याबाबत प्रशांत मधुकर पाटील (रा. अशोकनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, संशयित रितेश सुधाकर बडगुजर, दिनेश टिकमदास मेहता (दोघेही रा. परिजातनगर, नाशिक) व हेमंत भाई (रा. गुजरात) या तिघांनी एजाज बुखारी यांच्या मालकीच्या इको पॉवर सिस्टिम या फर्मचे दिल्ली स्टेट इंडस्ट्रीयल अँण्ड इंफ्राडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या फर्मशी संबंध नसताना या फर्मचे अधिकृत अधिकारी व्ही. आर. गुप्ता यांच्या बनावट स्वाक्षरीचा आयसीआयसीआय बँकेच्या दिल्ली शाखेचा बनावट चेक तयार केला व तो खरा असल्याचे भासवून आपल्या खात्यात जमा करून वटविण्याचा प्रयत्न केला. यात बँकेबरोबर कंपनीचीही फसवणूक झाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून, तिघा संशयितांना न्यायालयाने 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.