आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक फसवणूक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल बिल्डरवर माेफाअंतर्गत गुन्हा, परभणीतील मालाणी कुटुंबीयांनी दिली तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थादरम्यान नाशिकला थांबण्यासाठी हक्काचे ठिकाण असावे कालांतराने नाशिकलाच स्थायिक व्हावे, यादृष्टीने परभणी जिल्ह्यातील मालाणी कुटुंबीयांनी जुने सिडकाेतील खाेडे मळा बडदेनगर येथील हेमांगी हाइट्स या ठिकाणी फ्लॅट खरेदी केला. मात्र, बिल्डरने त्यांना करारनाम्याप्रमाणे घर देता त्यांची अार्थिक फसवणूक केल्यामुळे नाशिकराेड पाेलिस ठाण्यात बिल्डर त्यांच्या पत्नीविरुद्ध शनिवारी (दि. १४) महाराष्ट्र अाेनरशिप अॅक्ट (माेफा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात अाला. 

सेलू येथील कुटुंबीयाने नाशिकमधील नातेवाइकांच्या मदतीने जुन्या सिडकाेतील खाेडे मळा, बडदेनगर येथील प्लाॅट नंबर १० वर बांधण्यात येणाऱ्या हेमांगी हाइट्स या प्रकल्पाला भेट दिली. तेथे नवनीत चुनीलाल मंडली हंसा नवनीत मंडली यांना भेटून १७ लाख २० हजार याप्रमाणे सदनिकांची खरेदी करत फिर्यादी त्यांचे नातलग मिळून दाेन फ्लॅटचा व्यवहार केला. त्यापाेटी लाख हजार २०० रुपये स्टॅम्प ड्यूटी नाेंदणी शुल्क म्हणून अदा केले. दरम्यान, या दाेन्ही फ्लॅटबाबत झालेल्या कराराव्यतिरिक्त राहण्याच्या दृष्टीने इतर सुखसुविधा पुरविण्याबाबत मंडली मालाणी यांच्यात बाेलणी हाेऊन त्याबाबतची नाेटरी करण्यात अाली. त्यासाठी ११ लाख ७६ हजार ८०० रुपये किंमत ठरविण्यात अाली हाेती. उभयतांमध्ये ठरल्याप्रमाणे करार झाल्यानंतर बिल्डरकडे बांधकामाबाबत चाैकशी केली असता अजून वेळ लागेल, असे सांगून ते फिर्यादीला सतत टाळत हाेते. त्यांच्या अशा उत्तरांमुळे कुंभमेळा संपूनही सदनिका ताब्यात मिळाल्या नाहीत. त्यामुळे मालाणी कुटुंबीयांना माेठ्या मानसिक त्रासाचा 
 
सामना करावा लागला. 
अखेर बिल्डरकडून कराराची पूर्तता केली जात नसल्यामुळे फिर्यादी सरला मालाणी यांच्या तक्रारीवरून नाशिकराेड पाेलिसांत बिल्डर त्यांच्या पत्नीविरुद्ध माेफाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात अाला. 
बातम्या आणखी आहेत...