आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली फिजिशियन बनले अादिवासींसाठी ‘अाराेग्यदूत’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फॅमिली फिजिशियन असाेसिएशनने सुरू केलेला अाराेग्य तपासणीचा उपक्रम खऱ्या अर्थाने या सुविधांपासून वंचित असलेल्या अादिवासींसाठी ‘अाराेग्यदूत’ ठरत अाहे. असाेसिएशनने मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डाॅ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयासोबत संयुक्तपणे एक अाराेग्य माेहीम नुकतीच राजेवाडी या गावात राबविली. यामध्ये पाचशेवर रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात अाले. रुग्णांमध्ये माेतीबिंदू, त्वचाराेग, अॅनेमिया तसेच कॅल्शियमची कमतरता अाढळून अाली. गरजू रुग्णांपर्यंत अाराेग्यसेवा अगदी माेफत पाेहाेचावी, यासाठी अशा अजून चार माेहिमा असाेसिएशनकडून राबविल्या जाणार अाहेत.
फॅमिली फिजिशियन असाेसिएशनच्या अध्यक्षा डाॅ. वर्षा चिट्टीवाड, खजिनदार डाॅ. स्मिता कांबळे, उपाध्यक्ष डाॅ. विनाेद देवरे, डाॅ. मृत्युंजय जाधव, डाॅ. मंगेश घुगे, डाॅ. प्रतिभा जाेशी, डाॅ. सुनंदा भाेकरे, डाॅ. श्रीनिवास िचट्टीवाड यांच्यासह ‘मविप्र’ रुग्णालयाचे तज्ज्ञ डाॅक्टर्स अाणि निमवैद्यकीय कर्मचारी अशा पन्नास जणांनी दुर्गम असलेल्या राजेवाडी या अादिवासीबहुल गावात जाऊन संपूर्ण दिवस अाराेग्यसेवेसाठी दिला. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नाशिकपासून तीस-पस्तीस किलाेमीटर अंतरावर असलेल्या राजेवाडी या गावात अद्यापही लाेकांना पुरेशा अाराेग्य सुविधा मिळत नसल्याचे विदारक चित्र या टीमला पाहायला मिळाले. येथे शिबिर घेत डाॅक्टरांनी महिला, अाबालवृद्धांची तपासणी केली. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचीही अाराेग्य तपासणी केली. गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रगत उपचारांची जबाबदारी ‘मविप्र’च्या वैद्यकीय रुग्णालयाने स्वीकारली. या उपक्रमासाठी राजेवाडीचे प्रमुख कार्यकर्ते पंकज दशपुते, ग्रीव्ह संस्थेचे रमेश अय्यर यांनी सहकार्य केले.

हे अाढळले तपासणीत
>दहागर्भवतींना तज्ज्ञ डाॅक्टरांच्या उपचारांची नितांत गरज
>दहा रुग्णांची माेतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड
>८० जणांना त्वचाराेग
>बहुतांश रुग्णांत अॅनेमिया, कॅल्शियमची कमतरता
>सर्वच शाळकरी मुलांना जंत प्रतिराेधक गाेळ्यांचे वाटप

उपक्रम चार गावांत राबविणार
राजेवाडीत अाम्हाला हे प्रकर्षाने जाणवले की, तेथे अद्यापही अाराेग्यकेंद्र नसल्याने लाेक तपासण्या करण्याचे टाळतात. अाम्ही असाच उपक्रम अजून चार अादिवासी पाड्यांत करणार अाहाेत.
डाॅ. वर्षा चिट्टीवाड, अध्यक्षा, फॅमिली फिजिशियन असाेसिएशन
बातम्या आणखी आहेत...