आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांनो, मुलांना विचार करायला शिकवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुलांच्या हुशारीचे परिमाण शोधण्यापेक्षा पालकांनी त्यांना विचार करायला शिकविण्याची गरज आहे. त्याचबराेबर राज्यकर्त्यांनी देशात समान शिक्षणप्रक्रिया राबविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जागतिक दर्जाचे विचारवंत संदीप वासलेकर यांनी केले.

‘चाकं शिक्षणाची’ या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या ‘एव्हरी चाईल्ड काऊंटस सिटिझन कॅम्पेन’ राबविण्यात आले. या माेहिमेत शहरातील नागरिकांच्या सहकार्याने सुमारे ७०० वंचित विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी महापालिका शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानिमित्ताने शनिवारी इस्पॅलियर एक्सप्रिमेंटल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षणार्पण सोहळ्यात वासलेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, युरोप, अमेरिकेमध्ये सर्वत्र समान शिक्षण प्रक्रिया राबविण्यात येत असून, तसेच हे देश शिक्षणासाठी अधिक पैसे राखून ठेवतात त्यामुळे ते देश विकसित झाले आहे. मात्र, भारतात त्या उलट स्थिती असून केवळ महाराष्ट्रात ४४ हजार खेड्यापैकी ३३ हजार खेड्यामध्ये केवळ सातवीपर्यंत शाळा आहेत. या विषयावर कोणताही पक्ष किंवा राज्यकर्ता बोलत नाही की, माध्यमामधून चर्चा घडून येत नाही.
महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम म्हणाले की, यावर्षी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. या वेळी आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, कामगार सहआयुक्त रा. सु. जाधव, भीष्मराज बाम, डाॅ. प्रशांत पाटील, कृष्णा भांडगे, वसुधा कुरणावळ, हेमंत भामरे हे उपस्थित होते, तर ‘चाकं शिक्षणाची’ या संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी या उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली.
अहंकारामुळेच शिक्षण पद्धत मागासलेली
शिक्षकांमध्ये सध्या अहंकार जास्त वाढत चालला आहे. आपल्या पेक्षा एखादा विद्यार्थी अधिक हुशार असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जातो. अशा इगोच्या समस्येमुळे शिक्षण पध्दत ही मागासलेली राहिली आहे.
गरीब श्रीमंतीनुसार मुलांची विभागणी
‘चाकं शिक्षणाची’ या संस्थेच्या शिक्षणार्पण सोहळ्याचे सूतकताई करून उद‌्घाटन करताना प्रसिद्ध विचारवंत संदीप वासलेकर. समवेत भीष्मराज बाम, कामगार आयुक्त रा. सु. जाघव, सचिन जोशी, रतन लथ, वसुधा कुरणावळ आदी.

आपल्याकडे मुलांची शाळा ही त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीवर ठरते आहे. त्यामुळे भारतात जोपर्यंत सर्वांना समान शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही असे वासलेकर यावेळी म्हणाले.
या दिल्या टिप्स
- मुलांना विचार करायला लावा.
- मुलांच्या गुणांमध्ये तुलना करू नका.
- मॉडर्न तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी वापर करा.
- टीव्ही, मोबाइल आणि नेटचा वापर शिक्षणासाठी करा.
- शालांत परीक्षानंतर मुलांना एक वर्ष सामाजिक अनुभव घेऊ द्या.
- सीओ होण्यापेक्षा सीओ घडविण्यासाठी उत्तम शिक्षक बना
- आयटीआयमुळेच रोजगार प्राप्ती.
बातम्या आणखी आहेत...