आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात स्वतःच चिता रचून शेतकऱ्याने पेटवून घेतले, राज्यात 9 कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍वत:च रचलेल्‍या चितेमध्‍ये उडी घेण्‍यापूर्वी सूपडू पवार यांनी सर्व क्रियाकर्मही स्‍वत:च केली. - Divya Marathi
स्‍वत:च रचलेल्‍या चितेमध्‍ये उडी घेण्‍यापूर्वी सूपडू पवार यांनी सर्व क्रियाकर्मही स्‍वत:च केली.
अाैरंगाबाद - शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमी भाव मिळण्यासाठी राज्यभर रान उठलेले असताना व त्याचा परिणाम म्हणून सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही महाराष्ट्रात शेतकरी अात्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. मागील दाेन दिवसांत राज्यात नऊ कर्जबाजारी शेतकरी अात्महत्यांच्या घटना घडल्या. त्यात परभणी जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्यासह मराठवाड्यातील चाैघांचा व नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश अाहे. मालेगाव तालुक्यातील एकाने तर चक्क अापलीच चिता रचून जाळून घेतले.  
 
परभणी जिल्ह्यातील अानंदनगर (ता. पाथरी) येथील लक्ष्मण जेसू पवार (६०) अाणि त्यांच्या पत्नी चपलाबाई पवार (४५) या शेतकरी दांपत्याने बुधवारी दुपारी विषारी अाैषध घेतले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच दाेघांचीही प्राणज्याेत मालवली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी अात्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील सुमठाणा (ता. शिरूर अनंतपाळ) येथील बालाजी शंकर बिरादार (४८) या शेतकऱ्याने मंगळवारी रात्री झाडाला गळफास घेऊन अात्महत्या केली. बिरादार यांच्या अडीच एकर शेतीवर ७५ हजार रुपये कर्ज हाेते, तर नांदेड जिल्ह्यातील माैजे मंडाळा (ता. उमरी) येथील तरुण शेतकरी लक्ष्मीकांत पुदलवार (२१) यानेही बुधवारी कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे विष घेऊन अात्महत्या केली.  
 
नाशिक जिल्ह्यातील सुपडू भिका पवार (७२, रा. खाकुर्डी (वडनेर), ता. मालेगाव), अप्पासाहेब खंडेराव जाधव ( ३२, रा. बोराळे, ता. चांदवड), कचरू पुंजा आहेर (६५, रा. शिवरे, ता. चांदवड) या तीन शेतकऱ्यांनी गेल्या २४ तासांत अात्महत्या केली. अप्पासाहेब जाधव (रा. बाेराळे) यांनी मंगळवारी सायंकाळी राेहित्रावर चढून अात्महत्या केली. विजेच्या प्रवाहातच स्वत:ला झाेकून दिल्यामुळे त्यांचा मृतदेह लाकडाने ढकलून खाली काढावा लागला. जाधव यांनी सोसायटीकडून ५० हजारांचे कर्ज घेतले होते, परंतु नापिकीमुळे ते अद्यापही न भरल्याने सोसायटीने त्यांना व्याजासह ७८ हजार ९५० रुपयांच्या जप्तीची नोटीस दिली होती. याच चिंतेतून त्यांनी अात्महत्या केली, तर शिवरे (ता. चांदवड) येथील कचरू पुंजा आहेर यांनी मंगळवारी रात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आहेर यांच्या मुलाच्या नावावर शिवरे येथे ०.४३ अार जमीन आहे. तसे मुलाच्या नावावर सोसायटीचे तीन लाखांचे कर्ज होते.    
 
धुळे जिल्ह्यातही अात्महत्या  
साेसायटीच्या कर्जाचा बाेजा सहन न झाल्याने  धुळे जिल्ह्यातील दरखेडा (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्याने विषारी अाैषध प्राशन करून अात्महत्या केली. दगडू अानंदा पवार (६७) असे मृत शेतकऱ्याचे नाव अाहे. बुधवारी दुपारी एक वाजता कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार अाला. पवार हे  दरखेडाचे माजी सरपंच व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनही होते. त्यांना तीन एकर शेती अाहे. सोसायटी व काही नातलगांकडून त्यांनी दीड ते दोन लाख रुपये कर्ज काढले व  पेरणी केली. मात्र, पावसाअभावी   पेरणी वाया गेली. अाता  दुबार पेरणीसाठी पैसे कोठून आणायचे या विवंचनेतून त्यांनी विषारी औषध प्राशन केले.    
 
बुलडाणा  शहरापासून जवळच असलेल्या सागवण येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मंगळवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकुशराव रामभाऊ भाकरे असे मृत शेतकऱ्याचे नाव अाहे. भाकरे हे अल्पभूधारक शेतकरी हाेते.  यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह  भागत नसल्याने ते मजुरीचे कामही करायचे.  शेतीतील उत्पन्नात सातत्याने होत असलेली घट आणि वाढते कर्ज याला कंटाळून त्यांनी  जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.  
 
साेलापुरातही अात्महत्येचा प्रयत्न  
उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर गावातील नामदेव गंगाराम फुलमाळी (५०) या शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाला कंटाळून बुधवारी सायंकाळी विषारी अौषध प्राशन केले. मात्र हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने  शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात अाले अाहेत. त्यांच्यावर अाता उपचार सुरू अाहेत.   
 
फुलमाळी यांच्यावर अाठ-दहा वर्षांपासून बँक अाॅफ इंडिया व जिल्हा बँकेचे साधारण अाठ-दहा लाखांचे कर्ज असल्याचे नातेवाईक सांगतात. सातत्याने नापिकी व उत्पन्न नसल्यामुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे फुलमाळी यांनी हे टाेकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचे नातलग सांगतात. दरम्यान, त्यांच्यावर कोणत्या बँकेचे किती कर्ज अाहे याची चौकशी पोलिसांकडून सुरू अाहे.
 
पुढे... वीजेची तार हातात धरुन शेतकऱ्याची आत्महत्या, लाकडाने काढावा लागला चिकटलेला मृतदेह...
 
हे पण वाचा,
 
 
बातम्या आणखी आहेत...