आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीट: नुकसानीच्या धक्क्याने प्रगत शेतक-याचा नाशकात मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गारपिटीने अख्खी द्राक्षबाग आडवी झाल्याचे पाहून म्हाळसाकोरे (ता. निफाड) येथील प्रगत शेतकरी माधवराव कोंडाजी गोरडे (65) यांचा गुरुवारी मृत्यू झाला. नऊ एकर शेतीवर आपल्या कुटुंबाची गुजराण करणा-या गोरडे कुटुंबीयांनी यावर्षीदेखील मेहनतीने तीन एकर द्राक्ष, तीन एकर कांदा आणि अडीच एकरवर गव्हाचे पीक उभे केले. बॅँक आणि सोसायटीचे पाच लाखांचे कर्ज फेडून सुखाने जगावे म्हणूनच तर हे सर्व होत होते.

द्राक्षाचा सौदा करून पैसे मोकळे करण्यासाठी व्यापा-यांशी बोलणेही सुरू होते. पंधरा दिवसांनी हाती येणारे द्राक्षपीक झोडपून निघाल्याने माधवराव अचानक बोलेनासे झाले. गुरुवारी सकाळीच ते कुणालाही काही न सांगता बाहेर पडले. शेतात वेढा करून अर्ध्या तासाने घरी परतल एकाकी वडिलांना काय झाले म्हणून मुलगा सोमनाथने शेजा-यांना बोलावले. तातडीने त्यांनी रुग्णालयात हलविण्याची घाई केली. काही अंतर जात नाही तोच माधवरावांनी अखेरचा श्वास घेतला.