आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस, केळीच्या क्षेत्रातून 700 क्विंटल डाळिंब निर्यात, आर. व्ही. एस. राजू यांचा यशस्वी प्रयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूर - कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील अडडताळे गावातील रुद्राराजू वेंकटसुब्बाराज सत्यनारायण यांनी प्रामुख्याने कापूस आणि केळीचे क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भागात २९ महिन्यांपूर्वी १५ एकरमध्ये हजार ७०० भगव्या डाळिंबाची लागवड करून पहिल्या वर्षीच ७०० क्विंटल डाळिंब कतार, दुबई, इंग्लंड अमेरिकेत निर्यात केले.
 
यंदाही सुमारे १५०० क्विंटल उत्पादन होणार असून, त्यापैकी ८० टक्के डाळिंब निर्यात होतील. प्रति किलो १५० ते १७० रुपयांनी आताच निर्यातदारांकडून मागणी आहे. शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत आणि योग्य नियोजन हवे, असे राजू सांगतात. सध्या त्यांची डाळिंब शेती पाहण्यासाठी कर्नाटक, केरळ, तामिळनाडूतील शेतकरी येत आहेत. 
 
केळी कापसाला अनुकूल असलेल्या जमिनीत वेगळा प्रयोग करण्यासाठी राजू यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ तसेच महाराष्ट्रातील शेतीची पाहणी केली. भागात घेण्याची खूणगाठ बांधली. नाशिकचे डाळिंब उत्पादक बाळासाहेब म्हैसधुणे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी चौदाशे क्विंटल डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले. 
 
अावडीमुळे केले प्रयाेग 
आवडीमुळे यशस्वी शेतीत प्रयोग करून यशस्वी होण्याची आवड आहे. त्यामुळे मी डाळिंब उत्पादनात यशस्वी झालो. आज माझी शेती पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत अाहे. 
- आर. व्ही. एस. राजू 
 
डाळिंब शेतीत यशस्वी होण्याची कारणे 
- मुरमाड आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन. 
- दहा कडधान्य असलेल्या स्लरीचा वापर. 
- झाडापासून दोन फुटांवर ड्रीप. 
- फळांच्या फुगवणीसाठी अक्रोड, काजू, बदाम, शेंगदाणे, शेण गोमूत्र यांचे मिश्रण. 
 
बातम्या आणखी आहेत...