आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त शेतकर्‍यांचा ‘रास्ता रोको’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - निर्यातमूल्यात घट होऊनही दोन दिवसांत कांद्याच्या दरात 200 रुपयांनी घट झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करून लिलावही बंद पाडले होते. निर्यातमूल्यच रद्द करा, अशी मागणी करत शेतकरी रोष व्यक्त करत होते. आंदोलनामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मंगळवारी (दि. 24) नाशिक दौर्‍यावर असल्याने त्यांचा हा दौरा यामुळे वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्राने कांद्याचे निर्यातमूल्य नुकतेच 800 डॉलरवरून 350 डॉलर केल्याने कांदा निर्यात होऊन दरात वाढ होण्याची अपेक्षा होती; मात्र शनिवार आणि रविवारी बहुतांश बाजार समित्यांत कांदा लिलाव बंद असतो. त्यामुळे सोमवारी आवक मोठय़ा प्रमाणात झाल्याने दरात 200 ते 300 रुपयांची घसरण होऊन दर 800 ते 850 रुपये प्रतिक्विंटल झाल्याने शेतकर्‍यांनी उमराणे, येवला, सटाणा, दिंडोरी, देवळा येथे रास्ता रोको आंदोलन केले. कांदा लिलावासाठी मोठय़ा उर्वरित. पान 6

कांदा गडगडल्याने पुन्हा शेतकर्‍यांचा ‘रास्ता रोको’
समजल्या जाणार्‍या पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा या बाजार समित्यांतील लिलावही बंद पाडण्यात आले. उमराणे येथे सुमारे तीन ते चार तास रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात झाली होती.

निर्यातमूल्यच रद्द करा
केंद्रीय कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेऊन निर्यातमूल्यच रद्द करण्याची मागणी करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केंद्राकडे ही मागणी केली आहे, आता पुन्हा मागणी करण्याची विनंती करणार आहे. शिरीष कोतवाल, आमदार

शेतकर्‍यांच्या भावना मांडणार
केंद्राने निर्यातमूल्य हे रद्दच केले पाहिजे. निर्यातीचे प्रमाण वाढले तरच कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होईल. मंगळवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ शेतकर्‍यांच्या भावना मांडणार आहे. दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती

घामाचा पैसा मिळत नाही
व्यापारी आणि मंत्र्यांच्या रणनीतीमुळे शेतकर्‍यांना घामाचा पैसा मिळत नाही. कांद्याचे दर असेच घसरत राहाणार असतील, तर कृषिमंत्री शरद पवार आणि वाणिज्य मंत्रालयाचे आनंद शर्मा यांनी त्वरित राजीनामे द्यावेत. - एस. के. गायकवाड, शेतकरी, उसवाड

आवक जास्त झाली
बाजार समितीत कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणात झाली आहे. तसेच कोलकात्यातही कांद्याची विक्री पंधराशे रुपयांनी होत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनाही वाहतूक खर्च परवडत नाही. त्यामुळे दर घसरले आहेत. - हितेश ठक्कर, व्यापारी