आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील लाखो शेतकरी 1 जूनपासून संपावर, 150 गावांतील शेतकर्‍यांसह अण्णा हजारे सहभाग घेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/सटाणा- दिवसेंदिवस शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ होत आहे. कर्जबाजारीपणाला आणि दुष्काळाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्र घेत संपाचे हत्यार उपसले आहे. कर्ज काढून शेती करण्यापेक्षा येत्या 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय जिल्ह्यातील 150 गावांमधील शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली आहे. शेतमालाला मिळणार हमीभाव, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय ठप्प पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कांद्रा, द्राक्षे, डाळींब या पिकांसोबतच भाजीपालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. 1 जूनला होणाऱ्या संपत 150 गावे सहभागी होणार असल्याने संपात शेतकऱ्यांची संख्या 1 लाखाहून अधिक असणार आहे. कर्ज काढून पिकविलेल्या शेतीत नुकसानच सहन करावे लागते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी अल्प भांडवलात कुटुंबाच्या गरजेपुरतेच धान्य पिकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गावोगावी बैठकाघेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे.जिल्हयात चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, इगतपुरी, सिन्नर, कळवण, सटाणा, येवला आदी तालुक्यांमधून शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांनी संप करण्याचे ठरविले आहे.

 
शेतकऱ्यांच्या संपात अण्णा हजारे सक्रीय सहभाग घेणार...
संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी 1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत. राज्यव्यापी आंदोलन अहिंसा मार्गाने होणार असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यात संपात सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य समन्वय समिती स्थापन करण्याची तयारी सुरु झाली आहे. राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत लवकरच या संदर्भात बैठक होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...