आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्‍महत्‍या, विष पिऊन संपवले जीवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सटाणा तालुक्यातील करंजाड येथील तरुण शेतकरी सुनील शांताराम देवरे (वय 31) यांनी कर्जाला कंटाळून मंगळवारी संध्‍याकाळी आत्‍महत्‍या केली. त्याच्यांवर करंजाड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे 150,000 रुपयांचे पिक कर्ज तसेच 40,000 सोने तारण कर्ज होते.
 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमूळे त्यांच्या डाळींब व कांदा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नैराश्यातून सुनील देवरे यांनी विषारी औषध सेवन करून आपली जीवन यात्रा संपवली. त्याच्यां मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वड़ील, दोन भाऊ असा परिवार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...