आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरीत ‘समृद्धी’च्या विराेधात शेतकरी ठाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - मुंबई-नागपूरसमृद्धी महामार्गासाठी इगतपुरीजवळील पिंप्रीसदो, तारांगणपाडा, तळोशी, नांदगावसदो, तळोघ या गावातील जमिनी संपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. इगतपुरीच्या नगराध्यक्षा जनाबाई खातळे, माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी या गावांतील शेतकरी कृषी विकास केंद्र उभारण्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत, याविषयी उपजिल्हाधिकाऱ्यांना परस्पर निवेदन दिल्याने येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेता हा निर्णय घेतल्याने रविवारी संतप्त शेतकऱ्यांनी बैठक घेऊन निषेध व्यक्त केला.

शेतकरीवर्गाने कोणत्याही प्रकारचा ठराव केलेला नसताना नगराध्यक्षा यांनी खोटी संमती असल्याचे सांगत शासनाचीही दिशाभूल करत शेतकऱ्यांची संमती असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिल्यानेे त्यांच्या विरोधात सोमवारी तहसील कार्यालयावर शेतकरी धरणे आंदोलन करणार असल्याचा एकमुखी ठराव बैठकीत करण्यात आला. इगतपुरीजवळ इंटरचेंज कृषी विकास केंद्र उभाण्यात यावे यासाठी परिसरातील गावाच्या शेतकऱ्यांनी कुठल्याही ठरावावर अर्जावर संमती दिलेली नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल फसवणुकीच्या उद्देशाने ही मागणी नगराध्यक्षांनी केल्याचे निदर्शनास अाले. या गावात कृषी विकास केंद्र उभारण्याविषयी शासनाची मागणी अथवा प्रस्ताव नव्हता. या मार्गाला शेतकरी जागा देणार नाही. मात्र, काही दलालांनी स्वार्थासाठी ही मागणी केलेली आहे.

बैठकीस सरपंच गंगाराम ठाकरे, संदीप पाटेकर, बबलू उबाळे, मतीन पठाण, बाजीराव पाटेकर, प्रकाश उबाळे, रामदास वाघचौरे, सोमनाथ साळुंके, मुगनी पटेल, शंकर सोनवणे, ताहिर पटेल, दीपक उबाळे, दौलत ठाकरे, नंदू पाटेकर, ज्ञानदेव पाटेकर शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
अगाेदर इगतपुरीकडेच लक्ष द्या, नंतर अामच्याकडे...
इगतपुरीच्या आजी-माजीनगराध्यक्षांनी प्रथम शहर विकासाकडे लक्ष द्यावे. नंतर इतर गावांचा विचार करावा. सद्यस्थितीत शहरातील घंटागाड्या बंद आहेत. रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे नगराध्यक्षांनी लक्ष दिल्यास फायदेशीर राहील. कृषी विकास केंद्र उभारण्यासाठी नगरपरिषदेची जागा द्यावी. आमच्या गावात येऊन इतपुरीच्या राजकीय नेत्यांनी यापुढे हस्तक्षेप करू नये. - संदीप पाटेकर, माजी उपसरपंच, पिंप्रीसदो
बातम्या आणखी आहेत...