आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत सोसायटी अध्यक्षांचे ठिय्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कर्जामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकर्‍यांची खाते नाशिक जिल्हा बँकेने गोठवले आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहेत. जिल्हा बँकेच्या निर्णयाच्या विरोधात मुख्य शाखेत सोसायटी अध्यक्षांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. विविध कार्यकारी सोसायट्यांचे तीन लाख सभासद असून त्यांचा कर्ज पुरवठा थांबला आहे. यामुळे खात्यात पैसे असूनही कर्ज न भरणाऱ्या 60 हजार सभासदांच्या खात्यावरील व्यवहारही ठप्प झाले आहेत.

खाती गोठवण्यात आलेले शेतकरी आणि संचालकांमध्ये आज (बुधवार) झालेल्या बैठकीत बाचाबाची झाली. शेतकर्‍यांनी बॅंक खाती तत्काळ मोकळी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, जिल्हा बॅंकेचे चेअरमन बैठकीला अनुपस्थित असल्याने शेतकरी ‍अधिकच संतापले.

...तर बॅंकेला कुलूप ठोकणार!
जिल्हा बॅंकेने शेतकर्‍यांची गोठवलेली खाती तत्काळ मोकळी करावी. अन्यथा 25 एप्रिलला बॅंकेला कुलूप ठोकून संचालकांना घेराव घालतील. तसेच यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, तर बॅंकेच्या संचालकांची हत्या होईल, असा संतप्त इशाराही शेतकर्‍यांनी बँकेला दिला आहे.

कर्ज पुरवठा अचानक बंद...
नाशिक जिल्हा बँकेने जिह्यातील सुमारे 1075 कार्यकारी सोसायट्यांचा कर्जपुरवठा अचानकपणे बंद केला आहे. जिल्हा बॅंकेने हा निर्णय कोणत्या आधारवर घेतला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...