आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या मालकाला वाचवा...! पोळ्यातील बैलांच्या अंगावर समद्धीविरोधाच्या घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- बैलांच्या अंगावर समृद्धीविरोधाच्या घोषणा रंगवून शिवडे, सोनांबे, डुबेरे, सोनारी या गावांतील शेतकऱ्यांनी प्रकल्पाविरोधात निदर्शने केली. समृद्धी महामार्ग रद्द करा, माझ्या मालकाला वाचवा, शेती वाचवा, शेतकरी वाचवा, असे फलक बैलांच्या अंगावर लावून समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला. 

शिवडे, सोनांबे, सोनारी, पांढुर्ली, डुबेरे या गावांमध्ये समृद्धीविरोधात घोषणा देण्यात आल्या. समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकरी बैलांसह पोळा मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळे बैलपोळ्यावर समृद्धी महामार्गाविरोधाचे सावट राहिले. काही शेतकऱ्यांनी सजविलेल्या बैलांच्या अंगावर समृद्धीविरोधात सरकारविरोधात घोषणा रंगविल्या. काहींनी बैलांच्या अंगावर घोषणांची झूल टाकली होती. शिंगांना घोषणांचे फलक लावण्यात आले होते. 

बैलपोळा हा खरा तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाचा सण मानला जातो. लाडक्या सर्जा-राजाला सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. सजविलेले बैल गावातील प्रमुख मंदिरांसमोर दर्शनासाठी आणण्याची परंपरा आहे. यावेळी बैलांकडून देवतांना सलामीही दिली जाते. मात्र, सण साजरा करतानाच समृद्धीविरोधाचा संताप शेतकऱ्यांत दिसून आला. सजविलेले बैल वाजतगाजत मंदिरासमोर आणताच समृद्धी महामार्ग रद्द करण्याच्या घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी गाव परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. एक इंचही जमीन देणार नाही, समृद्धी महामार्ग रद्द करा आदी घोषणा देण्यात आल्या. सोनारी येथील शेतकऱ्यांनी साेमवारीही फास अडकडवून समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला. डुबेरेतही निषेधाच्या घोषणा देण्यात अाल्या. 
बातम्या आणखी आहेत...