आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साहेब, आमची मुलं विचारतील, तुम्ही आमच्यासाठी काय कमावलं...’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘हरितपट्ट्यातल्या जमिनी पिवळ्या पट्ट्यात आल्या आणि त्यावर साधुग्रामचं आरक्षण पडलं. शिवाय, इतर ठिकाणचीही आमची काही शेती ही इंडिया बुल्सच्या लोहमार्गासाठीही घेतली आहे. आम्हीच काय पाप केलं. अहो, आमची मुलं विचारतील, तुम्ही आमच्यासाठी काय कमावलं. तर काय उत्तर देऊ, काही करा पण जमिनी कायमस्वरूपी विकत घ्या, म्हणजे आम्हाला दुसरीकडे जागा घेता येतील,’ अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. यानंतर जिल्हाधिका-यांनीही साधुग्रामसाठीच्या जमिनीचा चेंडू शासनाच्या कोर्टातच टोलवून लावला.
साधुग्रामसाठी जमिनी तात्पुरत्या स्वरूपात आरक्षित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यावर शेतकऱ्यांना नोटिसा देत त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी झालेल्या बैठकीत जमीन मालकांनी जमिनी कायमस्वरूपी घेण्याचा हेका लावून धराल. शिवाय त्यासाठी पिवळ्या पट्ट्याच्या बाजारभावानुसार दर देण्याची मागणी केली. चांगले दर अथवा योग्य टीडीआर देण्याची तसेच भाड्याने जमिनी घेणार असल्याने सातबाऱ्यावरही त्याची नोंद होणार असल्याची भीती व्यक्त केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर कुठलीही नोंद होणार नसल्याचे मोबदला थेट संबंधितांच्या खात्यावर देण्यात येणार असल्याचे सांगितले. बैठकीस जिल्हाधिकारी विलास पाटील, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पालिका आयुक्त सोनाली पोंक्षे, मेळा अधिकारी महेश पाटील, उदय किसवे, शहर अभियंता सुनील खुने शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनास अहवाल देणार
बैठकीत कायमस्वरूपी जमीन घेण्याची मागणी झाल्याने ही बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले. सध्या तिचा योग्य मोबदलाही दिला जाईल. जमीन ‘जैसे थे’ अवस्थेत परत केली जाईल. याबाबतचा अहवाल शासनाला देणार अाहोत, मात्र सिंहस्थासाठी जमिनी लागणारच असल्याचे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. विलासपाटील, जिल्हाधिकारी